Ram Mandir: प्राणप्रतिष्ठेआधी राम लल्लाच्या डोळ्यावर बांधलेली असेल पट्टी; काय आहे धार्मिक महत्व?

अयोध्येमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापणा होणार आहे. त्यामुळे अयोध्येमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे
Ram Mandir
Ram Mandir
Updated on

नवी दिल्ली- अयोध्येमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापणा होणार आहे. त्यामुळे अयोध्येमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे. मात्र, प्राण प्रतिष्ठेपर्यंत राम लल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाणार आहे. याबाबत अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. पण, असं करण्यामागे एक धार्मिक महत्व आहे.

अयोध्येत राम लल्लाच्या मूर्तीचे अनावरण १७ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे. यादरम्यान रामनगरीत यात्रा काढली जाणार आहे. यात राम लल्लाच्या मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असणार आहे. यामागे ज्योतिष असल्याचं सांगितलं जातं. (ayodhya mandir ram lalla pran prathistha rams idoles eyes will be blind folded know reasons)

Ram Mandir
Ram Mandir Invitation Card: राम मंदिर निमंत्रण पत्रिकेत गंभीर चूक; व्हिडीओ व्हायरल

अशी भावना आहे की जेव्हा कोणी भक्त दर्शन घेतो त्यावेळी देवाच्या डोळ्यात पाहतो. अशावेळी देव आणि भक्त यांच्या डोळ्यांच्या मिलनातून भावनांची देवाण-घेवाण होते. अशावेळी भगवान वशीभूत होतात आणि आपल्या प्रिय भक्तासोबत कोठेही जाण्यास तयार होतात. कलयुगामध्ये असं झालं आहे. हीच मान्यता लक्षात घेऊन यात्रेदरम्यान रामलल्लाच्या डोळ्यांवर पट्टी असेल. प्राण प्रतिष्ठेनंतरच पट्टी काढण्यात येईल.

Ram Mandir
कशी आहे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका? पाहा Photo...

राम मंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरात तयारी सुरु करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जानेवारी हा एक ऐतिहासिक दिवस ठरण्याची शक्यता आहे. १६ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत विविध पूजा विधिंच्या माध्यमातून राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.

२२ जानेवारीपूर्वी अयोध्येमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात लाखो लोक सहभागी होणार आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक लोक देशभरातून अयोध्येच्या दिशेने पायी चालत येत आहेत. प्राणप्रतिष्ठेसाठी आठ हजारांपेक्षा अधिक मान्यवर अयोध्येत येणार आहेत. यासाठी कडोकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्राण पतिष्ठा करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.