अयोध्येतील मशिदीला स्वातंत्र्य सैनिकाचे नाव

Maulvi Faizabadi
Maulvi Faizabadi
Updated on
Summary

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर 5 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या अयोध्या मशिद-हॉस्पिटल प्रोजेक्टचे नाव स्वातंत्र्य सैनानी आणि क्रांतीकारी मौलवी अहमद शाह फैजाबादी यांच्या नावावरुन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अयोध्या- सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर 5 एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या अयोध्या मशिद-हॉस्पिटल प्रोजेक्टचे नाव स्वातंत्र्य सैनानी आणि क्रांतीकारी मौलवी अहमद शाह फैजाबादी यांच्या नावावरुन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मौलवी अहमद शाह फैजाबादी आजच्याच दिवशी 164 वर्षांपूर्वी शहीद झाले होते. मंगळवारी मशिद ट्रस्टने याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे मशिद, हॉस्पिटल, संग्रहालय, रिचर्स सेंटर आणि कम्युनिटी किचनला फैजाबादी यांचे नाव असेल. फैजाबादी यांचे 1857 च्या उठावात महत्त्वाचे योगदान होते. त्यांनी दोन वर्ष अवध प्रांताला ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त ठेवलं होतं. (Ayodhya Mosque project to be named after freedom fighter Maulvi Faizabadi)

सुन्नी वक्फ बोर्डाने नेमलेल्या ट्रस्टने नऊ महिन्यांपूर्वीच स्पष्ट केलं होतं की, मशिदीला मुघल सम्राट बाबरचे नाव देण्यात येणार नाही. टाईम्स ऑफ इंडियाला बोलताना IICF सचिव अथर हुसैन म्हणाले की, फैजाबादी यांच्या शहीद दिनी, आम्ही संपूर्ण प्रोजेक्टला त्यांचे नाव देण्याचं ठरवलं आहे. जानेवारी महिन्यात आम्ही रिसर्च सेंटरला मौलवी फैजाबादी यांचे नाव दिले होते. फैजाबादी हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक आहेत. स्वातंत्र्याच्या 160 वर्षानंतरही त्यांना भारतीय इतिहासाने योग्य स्थान दिलं नाही.

Maulvi Faizabadi
''बंगालमधील कोरोना मृत्यूसाठी EC जबाबदार''; कोर्टात याचिका

1857 च्या उठावात फैजाबादमधील मशिद सराई फैजाबादींचे मुख्य केंद्र होते. सध्या हीच एक त्यांच्या नावाची इमारत शिल्लक आहे. ब्रिटिश हस्तकांनी त्यांना मारल्यानंतर त्यांचे शरीर आणि मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी पुरले होते. जेणेकरुन त्यांची समाधी होऊ नये. अनेक ब्रिटिश इतिहासकारांनी फैजाबादी यांच्या शौर्य आणि धाडसाचे गौरवोद्वार काढले आहेत. पण, त्यांना आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये कसलेही स्थान देण्यात आले नाही, असं ट्रस्टचे अफझल अहमद खान म्हणाले.

Maulvi Faizabadi
Video: 'सरसेनापती हंबीरराव' मधील महाराजांचे सिंहासनाधिश्वर दर्शन

संशोधक आणि इतिहासकार राम शंकर त्रिपाठी म्हणतात, मुस्लिम धर्माचे पालन करत असताना फैजाबादी यांनी धार्मिक एकतेचा संदेश दिला. गंगा-जमूना संस्कृती ते मानायचे. 1857 च्या उठावात त्यांनी कानपूरचे नानासाहेब, कुंवर सिंग यांच्यासारखंच शौर्य दाखवलं. पवायनचा जमिनदार राजा जगन्नाथ सिंह याने ब्रिटिशांविरोधात आपल्यात सामील व्हावे यासाठी ते प्रयत्न करत होते. याच प्रयत्नासाठी ते 5 जून 1858 मध्ये राजा जगन्नाथ सिंहच्या किल्लावर गेले होते. किल्याच्या द्वारावर उभे असतानाच जगन्नाथ सिंहच्या भावांनी आणि सिपायांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()