Ayodhya Pran Pratishtha : ''संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये श्रीराम विराजीत आहेत, पण त्यांच्या अस्तित्वावरुन...'' मोदींनी बोलून दाखवली खंत

अयोध्येत भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. देशभरातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
Ayodhya Pran Pratishtha
Ayodhya Pran Pratishthaesakal
Updated on

Ayodhya ram mandir news : अयोध्येत भव्य राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. देशभरातील अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली.

मुख्य कार्यक्रमानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुलामीच्या मानसिकतेला तोडून राष्ट्र उभा राहात आहे. हे राष्ट्र नवइतिहास घडवणार आहे. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या तारखेची आणि घडीची चर्चा करतील. ही खूप मोठी रामकृपा आहे, आपण सगळे या क्षणाचे साक्षीदार आहोत.

''आज सगळ्या दिशा दिव्यतेने परिपूर्ण झाल्या आहेत. ही वेळ कालचक्रावर सर्वकालीन शाईने अंकित झालेली रेखा ठरणार आहे. आपण सगळे जाणतो, जिथे रामाचं कार्य असतं तिथे पवनपुत्र हनुमान विराजमान होत असतात, त्यांना मी नमन करतो.''

Ayodhya Pran Pratishtha
Ayodhya Pran Pratishtha: 'PM नरेंद्र मोदी हे 'तपस्वी', आपल्यालाही तपश्चर्या करावी लागेल; RSS प्रमुख मोहन भागवत काय म्हणाले?

मोदी पुढे म्हणाले, मी सध्या दैवी अनुभव करत आहे, ज्यांच्या आशीर्वादाने हे महान कार्य पूर्णत्वास गेलं, ते दिव्य आत्मे इथेच आहेत. त्यांना मी नमन करतो. मी आज प्रभू श्रीरामांची माफीही मागतो. आमच्या तपस्येत, पुरुषार्थात कमी राहिली होती, कारण आपण इतकी वर्षे हे कार्य करु शकलो नाहीत. आज हे कार्य पूर्ण झालेलं आहे. मला विश्वास आहे, प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील.

Ayodhya Pran Pratishtha
Ayodhya Pran Pratishtha: PM मोदींनी उपवास ज्यांच्या हातून सोडला ते स्वामीजी कोण? महाराष्ट्रातील नगरमध्ये झालाय जन्म

''रामाच्या अस्तित्वासाठी कायदेशीर लढाई''

त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास श्रीरामांना भोगावा लागला आणि सर्वांनाच वियोग सहन करावा लागला. आज आपल्याला शेकडो वर्षांचा वियोग सहन करावा लागला आहे. अयोध्या आणि देशवासियांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला. कित्येक पिढ्यांना भोगावं लागलं आहे. भारताच्या संविधानाच्या पहिल्या प्रतीमध्ये भगवान राम विराजमान आहेत. संविधान अस्तित्वात आल्यानंतरही अनेक दशकं प्रभू श्रीरामांच्या अस्तिवासाठी कायदेशील लढाई लढावी लागली. मी भारताच्या न्यायपालीकेचे आभार मानतो. त्यांनीच न्यायाची लाज राखली. न्यायामुळे प्रभू रामाचं मंदिर उभारलं गेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.