Ayodhya Ram Mandir : आजपासून घेता येणार रामलल्लाचं दर्शन! जाणून घ्या आरतीची वेळ अन् बुकिंगची प्रक्रिया..

हे मंदिर दिवसातून किती वेळ खुलं असणार आहे, दिवसातून किती वेळा आरती होईल तसंच यासाठी बुकिंग प्रक्रिया काय असणार आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत..
Ayodhya Ram Mandir Aarti
Ayodhya Ram Mandir AartieSakal
Updated on

Ayodhya Ram Mandir Schedule and Booking Process : भव्य आणि ऐतिहासिक अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. हे मंदिर दिवसातून किती वेळ खुलं असणार आहे, दिवसातून किती वेळा आरती होईल तसंच यासाठी बुकिंग प्रक्रिया काय असणार आहे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मंदिराची वेळ

अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे. सकाळी सात ते 11.30 वाजेपर्यंत दर्शन खुले असणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रवेश मिळणार नाही. पुढे दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा हे मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे.

आरतीची वेळ

मंदिर सर्वांसाठी खुले होण्यापूर्वीच, म्हणजे पहाटे 6.30 वाजता याठिकाणी जागरण/श्रीनगर आरती पार पडेल. या आरतीला केवळ त्यांनाच प्रवेश मिळेल ज्यांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. तसंच संध्या आरती ही सायंकाळी 7.30 वाजता असणार आहे. यासाठी देखील केवळ बुकिंग असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल. (Ayodhya Ram Mandir Aarti Timings)

Ayodhya Ram Mandir Aarti
Ayodhya Ram Mandir : एआयची कमाल! जिवंत झाले रामलल्ला, हसत हसत पाहिला भक्तांचा आनंद.. व्हिडिओ व्हायरल

बुकिंग प्रक्रिया

पहाटेच्या जागरण आरतीसाठी भाविकांना आधीच्या दिवशी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावं लागणार आहे. किंवा आरतीच्या 30 मिनिटे आधी श्री राम जन्मभूमी कॅम्प ऑफिसमधून आरतीचा पास मिळवता येईल. संध्या आरतीसाठी तुम्ही आधीच्या दिवशी किंवा त्याच दिवशी बुकिंग करू शकता. (Ayodhya Ram Mandir Aarti Pass Booking)

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. बुकिंग करण्यासाठी तुमच्याजवळ अधिकृत सरकारी आयडी प्रूफ असणं गरजेचं आहे. याच वेबसाईटवर आरतीसाठी ऑनलाईन पासेस बुक करता येईल. विशेष म्हणजे, आरतीचे पासेस अगदी मोफत आहेत. यासाठी कोणत्याची प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. (Ayodhya Ram Mandir Aarti Pass Price)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.