Jagdish Aphale: १९९२ मध्ये आंदोलनकर्ते ते आज राम मंदिराचे प्रोजेक्ट मॅनेजर...कोण आहेत पुण्याचे जगदीश आफळे?

अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. हजारो कामगार राम मंदिर उभारणीसाठी काम करत आहे. दरम्यान राम मंदिर प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे.
Jagdish Aphale
Jagdish Aphaleesakal
Updated on

Jagdish Aphale : अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे जवळपास निम्मे काम पूर्ण झाले असून येत्या २२ जानेवारी मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. गर्भगृहात रामलल्लाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे. हजारो कामगार राम मंदिर उभारणीसाठी काम करत आहे. दरम्यान राम मंदिर प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे.

आगामी राम मंदिर 2.7 एकरमध्ये पसरलेले आहे आणि त्याचे बिल्ट-अप क्षेत्र 57,400 चौरस फूट आहे. त्याची उंची 360 फूट आणि रुंदी 265 फूट आहे. मंदिराला 366 खांब, पाच मंडप आणि 12 दरवाजे आहेत. गुढ मंडप, रंगमंडप, नृत्य मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप या नावानेही पाच मंडप ओळखले जातात.

जगदीश आफळे कोण आहेत?

श्रीराम जन्मभूमी न्यासाकडून आठ मुख्य अभियंते प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. त्यात डॉ. जगदीश आफळे (पुणे) यांचा सहभाग आहे. पुण्यातील पद्मावती भागातील रहिवासी असलेले डॉ. आफळे यांना देश-परदेशातील मोठे बांधकाम प्रकल्प उभारणीचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची पत्नी माधुरी यादेखील मंदिर शिल्पकलातज्ज्ञ आहेत.

हे दोघेही गेल्या साडेतीन वर्षांपासून अयोध्येत मंदिर उभारणीच्या कार्यात पूर्ण वेळ सहभागी आहेत. तत्पूर्वी सुमारे तीन वर्षे या दांपत्याने अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विस्तारक म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. (Latest Marathi News)

Jagdish Aphale
Corona Update India: देशात कोरानाचा आलेख वाढताच... गेल्या 24 तासात सक्रिय रुग्ण अन् मृत्यूमध्ये देखील वाढ

जगदीश आफळे म्हणाले, "राम मंदिर आंदोलनात १९८९ पासून मी सहभागी आहे. १९८९ मध्ये जेव्हा रामशिला पूजन केलं होत. ते शिला घेऊन मी अयोध्येला आलो होतो. जेव्हा १९९१, ९२ ला रथयात्रा झाली. त्या यात्रेत देखील मी सहभागी होतो. ते १९९२ ला प्रत्यक्ष बाबरी पाडली तेव्हा त्याचा एक मी भाग होतो. त्यावेळी असं मंदिर उभारंल जाव असं वाटत होतं आणि संधी मलाच मिळाली. साडेतीन वर्ष झाली मी अयोध्येत आहे. मला खूप अभिमान वाटत आहेत."

दिनचर्येबाबत डॉ. आफळे म्हणाले, ‘‘अभियंता म्हणून आमच्याकडे विशिष्ट जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. आम्ही पूर्ण वेळ आम्हाला दिलेले काम करतो. दर शनिवारी आमची येथे आढावा बैठक असते. श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधी अवनीश अवस्थी यांच्यासह काही अधिकाऱ्यांबरोबर दर सोमवारी बैठक होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महिन्यातून एकदा येथे प्रत्यक्ष येऊन आढावा घेतात. नियोजित वेळापत्रकानुसार शिस्तबद्ध पद्धतीने काम चालेल यावर आमचा कटाक्ष असतो.’’ मंदिर उभारणीच्या प्रशासकीय कामात माधुरी यादेखील सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

Jagdish Aphale
Shirur Lok Sabha: "मग होऊन जाऊ द्या कोल्हे विरुद्ध वळसे पाटील, कळेल घाट कोण मारतो" ; शरद पवार गटाचे अजितदादांना आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.