Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या निमंत्रणावरून राजकारण पेटलं; ठाकरे गटाला डावललं तर राज ठाकरेंना आमंत्रण

पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirEsakal
Updated on

नवी दिल्ली: पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्‍घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातून या सोहळ्यासाठी जाणाऱ्या अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू झाली असून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. याच मुद्यावरून ठाकरे गट विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय पातळीवरही अनेक विरोधी पक्षांनी निमंत्रण मिळूनही या सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले होते पण पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण आम्हाला मान्य नसल्याचे सांगत या सोहळ्याला आमचे प्रतिनिधी जाणार नसल्याचे म्हटले आहे.

करात म्हणाल्या, ‘‘आम्ही या सोहळ्याला जाणार नाहीत, विविध धार्मिक श्रद्धांचा आम्ही आदरच करतो पण ते धर्माचे राजकारण करत आहेत. स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी धर्माचा वापर करणे हे योग्य नाही.’’ करात यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या, ‘‘आम्ही सर्वांना निमंत्रण पाठविले आहे पण ज्यांना रामाचे बोलावणे आले आहे तेच या सोहळ्याला येतील.’’ दुसरीकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आम्ही या सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात! अयोध्येत कामाला वेग; उद्‍घाटनानंतर भाविकांना लगेचच मिळणार दर्शन

माझ्या हृदयात राम: सिब्बल

काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी राम माझ्या हृदयात असल्याने या सोहळ्याला जाण्याची आवश्यकता मला वाटत नाही, असे नमूद केले. लोकसभेतील विरोधीपक्ष नेते अधीररंजन चौधरी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले असून राहुल गांधी यांना अद्याप निमंत्रण मिळाले की नाही हे स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Ayodhya Ram Mandir
Corona JN.1 Virus: सावधान! कोरोना विषाणूचा JN.1 व्हेरीयंट 7 राज्यांमध्ये पसरला, 'या' राज्यात सर्वाधिक रूग्णसंख्या

कटियार यांना निमंत्रण नाही

राममंदिर आंदोलनातील मोठा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विनय कटियार यांनाही अद्याप या सोहळ्याचे निमंत्रण पाठविण्यात आले नसल्याचे कळते. उमा भारती मात्र १८ जानेवारी रोजीच अयोध्येत दाखल होणार आहेत. कटियार हे अयोध्येमध्ये राहतात पण त्यांनाच अद्याप हे निमंत्रण का पाठविण्यात आले नसावे? यावरून चर्चा रंगली आहे.

भाजप घडवून आणणार रामदर्शन

अयोध्येतील रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेनंतर भाजपने लाखो लोकांना दर्शन घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे. देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघांतील अडीच कोटी लोकांना रामाचे दर्शन घडवून आणण्यात येईल. याची जबाबदारी भाजपचे स्थानिक खासदार आणि आमदारांकडे सोपविण्यात आली आहे. अयोध्येतील भ्रमंतीनंतर हे नागरिक आपापल्या घरी परततील.

Ayodhya Ram Mandir
Ram Mandir Ayodhya: मंदिर उभारणीत मराठीजनांचा मोलाचा वाटा; आठपैकी पाच मुख्य अभियंते महाराष्ट्रातील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.