Ayodhya Ram Mandir : भाविकांना अयोध्यानगरी आणि राम मंदिराच्या हवाई दर्शनाचीही सोय

श्रीरामाच्या दर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशचे सरकार हेलिकॉप्टरची सेवा सुरू करणार आहे.
Ayodhya Ram Mandir : भाविकांना अयोध्यानगरी आणि राम मंदिराच्या हवाई दर्शनाचीही सोय
Updated on

अयोध्या - रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेआधीच अयोध्येत भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. श्रीरामाच्या दर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी उत्तर प्रदेशचे सरकार हेलिकॉप्टरची सेवा सुरू करणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे लखनौहून या सेवेचा प्रारंभ करणार आहेत.

उत्तर प्रदेशमधील सहा जिल्‍ह्यांमधून हेलिकॉप्टरने अयोध्येला जाता येणार आहे. भाविकांना अयोध्यानगरी आणि राम मंदिराचे हवाई दर्शनाची सोयही करण्यात येणार आहे. याची जबाबदारी पर्यटन विभागाकडे दिली. मथुरेतील बरसाना येथील गोवर्धन परिक्रमेजवळ आणि आग्र्यातील आग्रा द्रुतगती मार्गाजवळही हेलिपॅड उभारले आहे. हे अंतर क्रमशः ४५६ आणि ४४० किलोमीटर एवढे आहे.

मंदिराचे हवाई दर्शन

  • शरयू नदीच्या किनाऱ्यावरील पर्यटक निवासाजवळ हेलिपॅडची उभारणी

  • भाविकांना हेलिकॉप्टरने राममंदिर, हनुमानगढी शरयू घाटा समेत प्रेक्षणीय स्थळांचे हवाई दर्शन

  • ही हवाई सफर १५ मिनिटांची असेल

  • हवाई दर्शनासाठी प्रति व्यक्ती ३ हजार ५३९ रुपये भाडे आकारणार

  • एका वेळी पाच भाविक हेलिकॉप्टरमध्ये

  • भाविक गोरखपूरहूनही उड्डाण करू शकतील

  • गोरखपूर ते अयोध्या हे १२६ किलोमीटर अंतर

  • सुमारे ४० मिनिटांच्या सफरीसाठी प्रति व्यक्ती ११ हजार ३२७ रुपये शुल्क

वाराणसी- अयोध्या

  • वाराणसीतील नमो घाटावरून हेलिकॉप्टर सेवा

  • सुमारे १६० किमी अंतर. प्रवासाचा काळ ५५ मिनिटे

  • प्रति व्यक्ती १४ हजार १५९ रुपये तिकीट

लखनौ ते अयोध्या

  • लखनौमधील रमाबाई येथून उड्डाण

  • १३२ किमी अंतर ४५ मिनिटांत कापणार

  • प्रति व्यक्ती १४ हजार १५९ रुपये तिकीट

पास व प्रसादाच्या नावे फसवणूक

अयोध्येमध्ये राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्यासाठी व्हीआयपी पास देण्याचे आमिष दाखवून भाविकांची फसवणूक केली जात असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि मंदिर ट्रस्टच्या वतीने सावधगिरीचा इशारा देण्यात आला.

आमच्यातर्फे पैसे घेऊन असे कोणतेही पास देण्यात येत नसून भाविकांनी फसवणुकीपासून सावध राहावे,’ असे मंदिर ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे आॅनलाईन वस्तुंची विक्री करणाऱ्या काही संकेतस्थळांवर अयोध्येतील रामाचा प्रसादही आॅनलाईन विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशा पद्धतीने प्रसादाची आॅनलाईन विक्री करण्यात येत नसल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

कलश पूजनविधी

अयोध्या - अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना मंगळवारी सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत बुधवारी राममूर्तीचा मंदिर परिसर प्रवेश विधी संपन्न झाला. त्याचप्रमाणे सकाळी कलश पूजनही करण्यात आले. शरयू नदीच्या तीरावर झालेल्या या कलश पूजनाला राजमजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्यासंख्येने भाविक उपस्थित होते. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी या विधीमध्ये सपत्नीक सहभागी होत कलश पूजनाचे विधी केले. या विधीनंतर शरयूमधील जल कलशांतून राममंदिरात नेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.