Ayodhya Ram Mandir: 'राम मंदिराचा तळमजला तयार! पूर्व प्रवेशद्वारावर खास व्यवस्था..', चंपतराय यांनी सांगितलं अयोध्या परिसरात कुठे काय असणार

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा उद्‍घाटन सोहळा होणार आहे. तीन मजली राम मंदिराचा तळमजला पूर्णपणे तयार आहे. श्री राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती देताना सांगितले की, मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirEsakal
Updated on

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा उद्‍घाटन सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. याबाबत रामनगरीत जय्यत तयारी सुरू आहे. मंदिर परिसरात चारही वेदांच्या सर्व शाखांचे पारायण आणि यज्ञ अखंड चालू असतील. मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापणा होईपर्यंत हा विधी सुरू राहणार आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराचा तळमजला तयार झाला असून पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे.

चंपत राय पुढे म्हणाले, "हे मंदिर 70 एकरच्या उत्तर भागात बांधले जात आहे. ते दक्षिणेकडील भागापेक्षा खूपच अरुंद आहे. यानंतरही एवढ्या अरुंद जागेत मंदिर का बांधले जात आहे, असा प्रश्न पडेल. मी तुम्हाला सांगतो की, 70 वर्षांपासून कोर्टात खटला सुरू आहे, तो या जमिनीबाबत होता. त्यामुळेच या ठिकाणी तीन मजली मंदिर बांधले जात आहे. त्याचा तळमजला तयार झाला असून बाकी बांधकाम सुरू आहे. याशिवाय मंदिराची मुख्य हद्दीचे बांधकाम अद्याप सुरू आहे".

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या निर्मितीचं काम आता चालणार २४ तास; 'इतक्या' कामगारांची संख्या वाढवली

गेल्या वर्षी मे महिन्यापासून बांधकामाला झाली सुरुवात

चंपत राय म्हणाले, "या मंदिराचे बांधकाम मे २०२२ पासून सुरू झाले आहे. गुलाबी वाळूचा दगड राजस्थानच्या बन्सी पहारपूरचा आहे. मजला हा मकराना संगमरवरी दगडाने बनवला आहे आणि गर्भगृह पांढरा संगमरवरी दगडापासून तयार केला आहे. मंदिराच्या खाली कोणतीही पोकळी नाही. दोन्ही मंदिर आणि परकोटा मंदिराचे वय एक हजार वर्षे आहे. त्याच्या बांधकामात 22 लाख घन दगड वापरण्यात येणार आहेत.

येत्या 7-8 महिन्यांत 7 मंदिरे बांधली जातील

त्यांनी पुढे सांगितले की, पुढील 7-8 महिन्यांत आणखी सात मंदिरे बांधली जातील ज्यात महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, निषाद राज, शबरी आणि अहिल्या मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय आवारात जटायूची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirEsakal
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir: राज ठाकरेंना खरंच निमंत्रण दिलंय का? राम मंदिराच्या उद्घाटनावरुन 'राज'कारण तेजीत

या मंदिर परिसरात भाविकांसाठी चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकावेळी २५ हजार यात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी लॉकर, पाणी, स्वच्छतागृहे, रुग्णालयाची व्यवस्था आहे. महापालिकेवर दबाव वाढू नये, यासाठी दोन सीवर ट्रीटमेंट प्लांट आहेत. विजेच्या बाबतीतही स्वयंपूर्णता आहे. 70 पैकी 20 एकर जागेत बांधकाम सुरू आहे, तर उर्वरित क्षेत्र हिरवाईने नटले आहे.

रामलल्लाच्या मूर्तीबाबत चंपत राय म्हणाले, ५ वर्षाच्या मुलाचे रेखाचित्र तयार करण्यात येणार आहे. कपाळापर्यंतची उंची ५१ इंच असावी. ज्या मूर्तीमध्ये देवत्व आणि बालसुलभता असेल त्या मूर्तीची निवड केली जाईल. कर्नाटकमधील दगडाने दोन मंदिरे बांधली जात आहेत. एक मकरानापासून बनवले जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दक्षिणेला हनुमानजी असतील, तर पूर्वेकडे प्रवेशद्वार असेल, ज्यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असेल.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात! अयोध्येत कामाला वेग; उद्‍घाटनानंतर भाविकांना लगेचच मिळणार दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.