Ayodhya Ram Mandir : रामलल्लाला देशविदेशातून भेटवस्तू

अयोध्येतील रामजन्मभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या राममंदिरासाठी देशविदेशातून विविध वस्तू अर्पण करण्यात आल्या आहेत.
Ayodhya Ram Mandir Picture Flag
Ayodhya Ram Mandir Picture Flagsakal
Updated on

नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमीवर निर्माण करण्यात आलेल्या राममंदिरासाठी देशविदेशातून विविध वस्तू अर्पण करण्यात आल्या आहेत. यामध्ये १०८ फूट लांबीची उदबत्ती, दोन हजार १०० किलोची घंटा, अकराशे किलोचा मोठा दिवा यांसह विविध वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तूंचा वापर मंदिरामध्ये करण्यात येईल अशी आशा या वस्तुंची निर्मिती करणाऱ्या कारागिरांनी आणि देणगीदारांनी व्यक्त केली आहे.

विदेशांतूनही भेटवस्तू

देवी सीतेचे जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील जनकपूर येथून तीन हजाराहून अधिक भेटवस्तू अयोध्येमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. या भेटवस्तूंमध्ये प्रामुख्याने चांदीच्या पादुका, विविध आभूषणे आणि वस्त्रे यांचा समावेश आहे. सुमारे ३० वाहनांतून या भेटवस्तू अयोध्येत पाठविण्यात आल्या. त्याचप्रमाणे श्रीलंकेतून आलेल्या प्रतिनिधींनीही जिथे देवी सीतेला ठेवण्यात आले होते त्या अशोक वाटिकेतून शिळा आणली आहे.

पूजेसाठीचे साहित्य

गुजरातमधील वडोदरा येथील विहा भारवाड यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी १०८ फूट लांबीची उदबत्ती तयार केली आहे. या उदबत्तीचे वजन तीन हजार ६१० दहा किलो आहे. तर या उदबत्तीची रुंदी ३.५ फूट आहे. ही उदबत्ती पर्यावरणपूरक असून सुमारे दीड महिने पेटती राहू शकते. या उदबत्तीचा सुगंध कित्येक किलोमीटर दूर जाऊ शकतो असा दावा भारवाड यांनी केला आहे.

त्याचप्रमाणे गुजरातमधील अहमदाबाद येथून अयोध्येतील राममंदिरासाठी ४४ फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि अन्य सहा ध्वजस्तंभ पाठविण्यात आले आहेत. राममंदिरासाठी उत्तर प्रदेशातील एटाह येथे आठ धातूंपासून मोठी घंटाही तयार करण्यात आली आहे.

यांचीही रामसेवा

  • सुरत येथील व्यापाऱ्यांकडून पाच हजार अमेरिकी हिऱ्यांपासून श्रीरामासाठी आभूषणांची निर्मिती

  • हैदराबादचे छल्ला श्रीनिवास शास्त्री सुवर्णाचा मुलामा देण्यात आलेल्या चरण पादुका घेऊन अयोध्येकडे पायी रवाना

  • वडोदरा येथील अरविंदभाई पटेल यांच्याकडून एक हजार १०० किलोचा पंचधातूचा दिवा अर्पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.