Ayodhya Ram Mandir : अयोध्येसह अवघा देश झाला राममय; पाचव्या दिवशीही विविध विधी

अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा देशच राममय झाला असून अमेरिकेप्रमाणेच अन्य देशांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Narendra Modi
Narendra ModiSakal
Updated on

अयोध्या - अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा देशच राममय झाला असून अमेरिकेप्रमाणेच अन्य देशांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष अयोध्येत आज पाचव्या दिवशीही रामलल्लाचे विविध धार्मिक विधी पार पडले.

दरम्यान या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी हे सोमवारीच (ता.२२) अयोध्येत येणार असून तिथे ते चार तास थांबतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी प्रतिकूल हवामानामुळे मोदी हे आधीच अयोध्येत येणार असल्याचे बोलले जात होते. पंतप्रधान मोदींनी आज तमिळनाडूतील श्रीरंगम येथील रंगनाथस्वामी मंदिरात पूजाअर्चा केली. यावेळी त्यांनी पारंपरिक तमीळ पोशाख परिधान केला होता.

यानंतर हवाई दलाच्या विशेष हेलिकॉप्टरमधून ते रामेश्वरमलाही गेले. येथील अरूलमिगू रामनाथस्वामी मंदिरामध्ये जाऊन त्यांनी प्रार्थना केली. यानंतर अग्नीतीर्थ येथील किनाऱ्यावर स्नान करून त्यांनी रामेश्वराचे दर्शन घेतले.

अयोध्येत आज पाचव्या दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासूनच अनुष्ठान आणि विविध धार्मिक विधींना सुरूवात झाली होती. आज प्रामुख्याने वास्तूपूजन पार पडले. याविधीमध्ये श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून अनिल मिश्रा आणि त्यांचे कुटुंबीय तसेच विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक हे सहभागी झाले होते. रामलल्लाचे शर्कराधिवास आणि फलाधिवास हे विधीही पार पडले.

दिवसभरात

- राजधानी दिल्लीत सोमवारी अर्ध्या दिवसाची सुटी

- रामलल्लाच्या अभिषेकासाठी विविध देशांतून पाणी

- प्राणप्रतिष्ठेसाठी ओडिशातून भव्य दिवाही येणार

- तिरूचिरापल्लीहून रामलल्लासाठी विशेष भेटवस्तू

- अलिगडने दिले चारशे किलोग्रॅम वजनाचे कुलूप

- काश्मिरी मुस्लिमांनी रामासाठी दोन किलो केसर पाठविला

- तिरुपती बालाजीकडून तीन टन लाडू मिळणार

असाही कडेकोट बंदोबस्त

- स्थानिक नागरिकांना ओळखपत्र देणार

- अयोध्येची सीमा आजपासूनच बंद

- अनेक भागांतील वाहतूक वळवली

- शहर, मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त

- ड्रोन अन् ‘एआय’च्या माध्यमातून देखरेख

चिथावणीखोर संदेश रोखण्याचे आवाहन

नवी दिल्ली - अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, समाज माध्यमांमध्ये काही पडताळणी न केलेले, प्रक्षोभक आणि असत्य संदेशही पसरविले जात आहेत, यामुळे देशातील धार्मिक सौहार्द आणि कायदा- सुव्यवस्था बिघडू शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले आहे.

ही बाब लक्षात घेऊन सरकारने वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, डिजिटल वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कुठलाही असत्य किंवा बनावट, तसेच ज्यामुळे सामाजिक, धार्मिक सलोखा बिघडू शकेल, असा कुठलाही मजकूर प्रकाशित करणे टाळावा, असे सांगण्यात आले आहे. समाजमाध्यमांवरून अशा प्रकारचा मजकूर व्हायरल होऊ नये म्हणून काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

पंधरा यजमान सहभागी होणार

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काशीच्या डोम राजांसह अन्य विविध घटकांतील पंधरा यजमान हे सपत्नीक सहभागी होणार आहेत. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याच्या उद्देशाने अशा पद्धतीने पूजन करण्यात येईल, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले.

उदयपूरमधून वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी, आसाममधून रामकुई जेमी, गुरूचरणसिंह गिल (जयपूर), कृष्णमोहन (हरदोई), रमेश जैन, अझलारासन (तमिळनाडू), विठ्ठलराव कांबळे (मुंबई), महादेव गायकवाड (लातूर), लिंगराजवासव राजप्पा (कलबुर्गी, कर्नाटक), दिलीप वाल्मीकी (लखनौ), अनिल चौधरी (डोमराजा काशी) आदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात यजमान म्हणून सहभागी होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()