Ayodhya Ram Mandir : अयोध्येशी हिंदूंचे नाही तर, शीख अन् जैन धर्माचे ही आहे खास नाते

अयोध्या हे केवळ हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र नाही तर शीख आणि जैन धर्मासाठी देखील अयोध्या हे शहर फार महत्वाचे आहे. अयोध्येशी जैन अन् शीख धर्माचे खास नाते आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येशी हिंदूंचे नाही तर, शीख अन् जैन धर्माचे ही आहे खास नाते
Updated on

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये श्रीरामांची प्रतिष्ठापणा लवकरच केली जाणार आहे. यासाठी अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir Latest News) प्रभू श्रीरामांच्या विधिवत पूजेला सुरूवात (Prabhu Shri Ram) देखील झाली आहे. येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे.

मात्र, अयोध्या (22 Jan Ram Mandir Inaugurations) हे केवळ हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र नाही तर शीख आणि जैन धर्मासाठी देखील अयोध्या हे शहर फार महत्वाचे आहे. शरयू नदीच्या काठावर वसलेल्या या रामनगरीचा शीख आणि जैन (Latest Marathi News) धर्माशी खास संबंध आहे. विशेष म्हणजे बौद्ध धर्माशी संबंधित असलेल्या काही कथांमध्ये ही याचा उल्लेख आढळतो.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येशी हिंदूंचे नाही तर, शीख अन् जैन धर्माचे ही आहे खास नाते
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील मंदिरासाठी केली होती 'भीष्म' प्रतिज्ञा, रामभक्त 31 वर्षानंतर सोडणार उपवास

अयोध्येमध्ये झालाय अनेक तीर्थंकरांचा जन्म

अयोध्या आणि जैन धर्माबद्दल बोलायचे झाल्यास, जैन धर्माच्या मान्यतेनुसार या धर्मामध्ये (Ayodhya Ram Mandir Latest Marathi News) जवळपास २४ तीर्थंकर होऊन गेलेत. यातील काही तीर्थंकरांचा जन्म अयोध्येमध्ये झाला होता. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचा जन्म अयोध्येमध्ये झाला होता. ज्यांच्याबद्दल वेदांमध्ये देखील वर्णन करण्यात आलेले आढळून येते.

या व्यतिरिक्त तीर्थंकर आदिनाथ, अभिनंदन नाथ, अजीत नाथ, अनंतनाथ आणि सुमित नाथ इत्यादी तीर्थंकरांचा जन्म देखील अयोध्येमध्ये झाला होता. त्यामुळे, जैन धर्माला मानणाऱ्या लोकांची फार मोठी संख्या अयोध्येमध्ये आहे.

अयोध्येमध्ये जैन धर्माची अनेक मंदिरे आहेत

प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये जैन धर्माशी संबंधित अनेक मंदिरे आहेत. या मंदिरांची एकूण (Ayodhya) संख्या ९ आहे. जैन धर्मातील तज्ज्ञ सांगतात की, ज्या ठिकाणी देवाचा जन्म होतो, त्या ठिकाणाला 'शाश्वत भूमी' असे म्हटले जाते. त्यामुळे, अयोध्या ही जैन धर्मासाठी देखील शाश्वत भूमी आहे.

अयोध्येतील रायगंजमध्ये भगवान ऋषभदेव यांची मूर्ती स्थापित आहे. या मूर्तीची उंची ३१ फूट आहे. या व्यतिरिक्त अयोध्येमध्ये श्री दिगंबर जैन मंदिर, अयोध्या जैन मंदिर आणि अयोध्या (Jain And Shikh Related Latest News) श्वेतांबर जैन मंदिर इत्यादी जैन धर्मीयांची श्रद्धा केंद्रे अयोध्येमध्ये आहेत.

गुरूबाणीमध्ये श्रीरामाच्या नावाचा उल्लेख

अयोध्या नगरीसोबत शीख धर्माचा ही जवळचा संबंध आहे. अयोध्येतील गुरूद्वारा नजरबाग आणि गुरूद्वारा ब्रह्मकुंडमध्ये गुंजणारी गुरूबाणी याचा पुरावा आहे. सनातन धर्म आणि शीख धर्म यांच्यातील संबंध हे प्रभू श्रीरामाशी घट्ट आहेत, असे अयोध्येतील काही संत मानतात.

गुरूबाणीमध्ये प्रभू श्रीरामांचे नाव वारंवार वापरले जाते, तर गुरू ग्रंथसाहिबामध्ये निर्गुण ब्रह्म हा सर्वव्यापी असल्याचे म्हटले आहे. या निर्गुण ब्रह्मालाच राम नावाने संबोधण्यात आले आहे.

गुरू नानकदेवजींनी अयोध्येला दिली होती भेट

गुरूद्वारा नजरबाग आणि गुरूद्वारा ब्रह्मकुंड यांचा थेट संबंध शीखांचे पहिले गुरू नानकदेव (Guru Nanakdev) यांच्याशी आहे, असे शीख धर्मातील काही तज्ज्ञ सांगतात. गुरूनानक देव हे १५०१ मध्ये अयोध्येत आले होते. त्यानंतर, ज्या ठिकाणी त्यांनी धूनी रमाई केली होती. त्या ठिकाणी एक बाग होती, याच बागेला नंतर नजरबाग असे म्हटले जाऊ लागले. याची पृष्टी नजरबाग गुरूद्वाराचे सेवादार ही देतात.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येशी हिंदूंचे नाही तर, शीख अन् जैन धर्माचे ही आहे खास नाते
Ram Mandir Pran Pratishta: अखेर रामलल्ला पोहोचले आपल्या नव्या घरी; मंदिराच्या गर्भगृहात आगमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.