Ayodhya Ram Mandir : मायावतींना निमंत्रण, पण उपस्थित राहणार नाहीत

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना निमंत्रण देण्यात आले.
Mayawati
Mayawatisakal
Updated on

लखनौ - अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना निमंत्रण देण्यात आले. विहिंपने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी निमंत्रण स्वीकारले असले तरी त्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. दरम्यान, मान्यवरांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी विहिंपकडून राम मंदिर ट्रस्टला सहकार्य केले जात आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडूंसह विविध क्षेत्रातील नामवंतांना निमंत्रण दिले जात आहे. त्याचवेळी विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार म्हणाले, बसप नेत्या मायावती यांनी निमंत्रण स्वीकारले, मात्र कार्यक्रमाला येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना पत्रिका दिली जात आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही कुरियरने निमंत्रण पत्रिका पाठविली आहे. त्यांना निमंत्रण मिळाले नसेल तर पुन्हा पाठविली जाईल. काही दिवसांपूर्वी अखिलेश यादव यांनी आपल्याला निमंत्रण पत्रिका मिळाली तर कार्यक्रमात सहभागी होऊ, असे म्हटले होते. मात्र नंतर त्यांनी आपल्याला जेव्हा प्रभू श्रीराम बोलावतील, तेव्हा अयोध्येला जाऊ, असे मत मांडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.