Ayodhya Ram Mandir : राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व पंतप्रधान मोदी करतील ; योगी आदित्यनाथ यांची माहिती

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे नेतृत्व करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली आहे. तसेच योगी म्हणाले, यावर्षीच्या अखेरीस भव्य दीपोत्सव समारंभ होणार आहे. अयोध्येत २१ लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत.

अयोध्या जगातील सर्वात सुंदर शहर म्हणून कायम राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री योगी गुरुवारी योगीराज भारत यांचे निवासस्थान असलेल्या भरतकुंड येथील नंदीग्राम येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. (Ayodhya Ram Mandir)

ते म्हणाले की, जानेवारीत पंतप्रधान मोदींच्या हातून ५०० वर्षांनंतर रामलल्ला मंदिरात विराजमान होतील.  यावेळी सर्व जग अयोध्येकडे आकर्षित होणार आहे.

मंदिर ट्रस्टचे पंतप्रधानांना 'निमंत्रण'

२२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा असली तरी मुख्यमंत्र्यांनी भाजप खासदारांना विविध कार्यक्रम आणि मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येचे वर्णन त्रेतायुगात एकेकाळी गाजलेल्या रामराज्याशी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली संपूर्ण देशाला प्रेरणा देणारा जिल्हा म्हणूनही त्यांनी अयोध्येचे वर्णन केले.

Ayodhya Ram Mandir
Bacchu Kadu : बच्चू कडूंना मोठा धक्का! ‘प्रहार’च्या नेत्याने धरली ‘वंचित’ची वाट!

२१ जून रोजी योग महोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. योग कार्यक्रमात सहभागी व्हायला हवे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरक्षा स्थिती सुधारली आहे. मानवतेच्या कल्याणासाठी भारत पुढाकार घेत असल्याचे दिसते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर नव्या भारताला मान मिळाले, असे देखील योगी म्हणाले.

पंतप्रधान मोदींच्या यशस्वी नेतृत्वाला जनतेचे आशीर्वाद मिळत राहतील आणि भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. पूर्वी अयोध्येला जाण्यासाठी ना रस्ते होते ना रेल्वे.

पूर्वी गोरखपूर आणि लखनौहून अयोध्येला जायला पाच-सहा तास लागायचे, आज हा प्रवास एका तासात पूर्ण होत आहे. विमानतळ बांधल्यानंतर त्रेतायुगाच्या आठवणी ताज्या करण्याची संधी मिळणार असल्याचे योगी यांनी स्पष्ट केले. 

Ayodhya Ram Mandir
America President : "हिंदूंनी ठरवलं तर ते अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवू शकतात"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.