Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील मंदिरासाठी केली होती 'भीष्म' प्रतिज्ञा, रामभक्त 31 वर्षानंतर सोडणार उपवास

७ डिसेंबर १९९२ रोजी शरयू नदीच्या काठावर स्नान केल्यानंतर झमेली बाबा यांनी अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अन्नत्याग करण्याचा संकल्प केला होता.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir
Updated on

Ayodhya Ram Mandir:  उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दरभंगाचे झमेली बाबा ३१ वर्षांनंतर उपवास सोडणार आहेत. झमेली बाबा ७ डिसेंबर १९९२ पासून फक्त फळे खात आहेत. ते भूक लागल्यावर केळी, सफरचंद, संत्री, द्राक्षे, मुळा, गाजर खात होते.  यामुळे त्यांची फलाहारी बाबा म्हणून ओळखू निर्माण झाली होती.

बाबरी मशीद पाडण्यात सहभागी असलेल्या झमेली बाबा यांनी ७ डिसेंबर १९९२ रोजी शरयू नदीच्या काठावर स्नान केल्यानंतर अयोध्येत रामलल्लाचे भव्य मंदिर बांधण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी अन्नत्याग करण्याचा संकल्प केला होता. त्यांची ही इच्छा ३१ वर्षांनंतर २२ जानेवारीला पूर्ण होणार आहे.

राम मंदिराच्या अभिषेक बरोबरच ते त्यांच्या झोपडीत उपवास सोडतील. दुसऱ्या दिवशी ते सुलतानगंज येथून पाणी घेऊन देवघर (बाबाधाम) कडे प्रस्थान करणार आहेत. त्याठीकाणी ते माघी पौर्णिमेनिमित्त २५ जानेवारीला जलाभिषेक करून अन्नदान करतील.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीच्या घुमटावर चढणारा पहिला असल्याचा दावा करणारे बहादूरपूर ब्लॉकच्या खैरा येथील रहिवासी वीरेंद्र कुमार बैठा उर्फ ​​झमेली बाबा विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनावर कार सेवक म्हणून सामील झाले होते. त्यांना राम अभिषेक सोहळ्याचे निमंत्रणही मिळाले आहे. (Ayodhya Ram Mandir News in Marathi)

वीरेंद्र कुमार बैठा हे बाबरी विध्वंस झाला तेव्हा आंदोलनात सहभागी होती. ते म्हणाले, "दरभंगाहून अडीचशे लोक अयोध्येला गेले होते. त्यावेशी मशीद परिसरात लोखंडी पाईप दिसला. त्या पाईपाने त्यांनी परिसर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. काही वेळात ते घुमटावर चढले. शेकडो शिवसैनिकही जमले होते. हे मिशन काही वेळातच पूर्ण झाले.”

Ayodhya Ram Mandir
Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

त्यानंतर वीरेंद्र कुमार बैठा शरयू नदीच्या तीरावर पोहोचले. तेथे स्नान करुन त्यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण व्हावे यासाठी अन्नत्याग करण्याचा संकल्प केला. झमेली बाबा अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून झमेली बाबा दर पौर्णिमेच्या दिवशी आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी सुलतानगंजहून देवघरला जातात आणि जलाभिषेक करतात.

झमेली बाबा म्हणाले, "अयोध्येची इच्छा पूर्ण झाली आहे, पण काशी-मथुरा बाकी आहे. विहिंपकडून आदेश आल्यास आंदोलनात नक्कीच उतरू." (Latest Marathi News)

Ayodhya Ram Mandir
Ram Mandir Pran Pratishta: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ ठरली, २४ पद्धतींनी होणार पूजा.. जाणून घ्या सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.