Ayodhya Ram Mandir : २२ तारखेला पंतप्रधान मोदी करणार पूर्ण दिवस उपवास?, असा असेल दिनक्रम

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिर उद्घाटनासह रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित राहणार आहेत.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal
Updated on

नवी दिल्लीः अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. २२ जानेवारीच्या मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिर उद्घाटनासह रामलल्लाच्या मू्र्ती प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थित राहणार आहेत. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने ७ हजार लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. पंतप्रधान अयोध्येत नेमकं काय-काय करणार, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ तारखेला उपवास धरणार आहेत. सांगितलं जातंय, राम मंदिराशी संबंधित विधींमध्ये सहभागी होण्यासाठी हे व्रत ते ठेवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी ११ वाजता पहिली पूजा करतील.

धार्मिक विधींसाठी उपवास करण्याची पंतप्रधानांची पहिली वेळ नाहीये. यापूर्वी ५ ऑगस्ट २०२० रोजी जेव्हा राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता तेव्हाही त्यांनी उपवास केलेला.

Ayodhya Ram Mandir
Sharad Mohol Attacked : कोथरुडमध्ये 'मुळशी पॅटर्न', गुंड शरद मोहोळवर गोळीबार, कोणी केला हल्ला?

पाचशे वर्षांपेक्षाही जास्त काळानंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार आहेत. या घटनेचा साक्षीदार होण्यासाठी अनेक दिग्गज लोक उपस्थित राहणार आहेत. सामान्य लोकांसाठी २६ जानेवारीपासून राम मंदिर सुरु राहणार आहे.

चालू वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत राम मंदिराचं काम पूर्ण होणार आहे. पारंपारिक पद्धतीनुसार बांधलेल्या मंदिराचा परिसर ३८० फूट लांब आहे, तर मंदिर १६१ फूट उंच असेल. मंदिराचा प्रत्येक माळा २० फूट उंच आहे. मंदिरामध्ये एकूण ३९२ खांब आणि ४४ प्रवेशद्वार असतील.

Ayodhya Ram Mandir
"गोळ्या घ्यायच्या होत्या अन् नाश्ता...", मारहाण केलीच नसल्याचा आमदार कांबळेंचा दावा, Viral Video नंतर दिलं स्पष्टीकरण

मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, ग्राऊंड फ्लोअरचं काम पूर्ण झालं आहे. पहिला आणि दुसरा माळा डिसेंबर २००४ पर्यंत पूर्ण होईल. हे मंदिर कमीत कमी एक हजार वर्षे सुस्थितीत राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.