Ayodhya Ram Mandir : राम मंदिराबाबत मोठी अपडेट! अयोध्येत प्राणप्रतिष्ठापनेची तारीख जाहीर

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir
Updated on

राम मंदिराचे दरवाजे सामान्य जनतेसाठी कधी खुले केले जाणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या सगळ्या दरम्यान, अयोध्या येथी राम मंदिराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

श्री राम मंदिरात प्रतिष्ठापणेच्या तारीख जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी वर्षात १५ ते २४ जानेवारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एका वृत्तवाहिनीला यासंबंधी माहिती दिली.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवले जाईल. तसेच प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील. २४ - २५ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे.

Ayodhya Ram Mandir
Uddhav Thackeray : 'त्यांना लाज वाटली पाहिजे…'; भाजपच्या केंद्रीय नेत्याचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

गर्भगृहाचा मुख्य दरवाजा सोन्याने मढवला जाईल, तसेच त्यावर सोन्याचे नक्षीकाम असेल, असेही मिश्रा यांनी सांगितले. मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावरही सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मंदिराची पायाभरणी होईल तेव्हाच अयोध्येला जाईन, असे पंतप्रधानांच्या मनात होते, म्हणूनच ते ५ ऑगस्ट २०२१ रोजी येथे आले होते.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, याआधी वीस वर्षांपासून पंतप्रधान मोदी येथे आले नव्हते. ते अयोध्येच्या जवळपास अनेक वेळा आले, पण इकडे आले नाहीत.

Ayodhya Ram Mandir
Weather Update : राज्यात मान्सून कधी सक्रीय होणार? मुंबईत 'या' दिवशी बरसणार पाऊस; हवामान खात्याने दिली माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.