Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या नावावर फसवणूक; QR कोड पाठवून पैसे उकळण्याचा प्रकार

एकीकडे राम भक्त संपूर्ण देशामध्ये आनंदोत्सव साजरा करीत आहेत तर दुसरीकडे काही ठग रामाच्या नावावर लोकांना लुबाडण्याचं काम करत आहेत.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir esakal
Updated on

नवी दिल्लीः अयोध्येत येत्या २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून देशभरातील रामभक्त राम मंदिराच्या निर्माणासाठी प्रयत्नशील होते. अखेर तो क्षण जवळ आलेला आहे.

एकीकडे राम भक्त संपूर्ण देशामध्ये आनंदोत्सव साजरा करीत आहेत तर दुसरीकडे काही ठग रामाच्या नावावर लोकांना लुबाडण्याचं काम करत आहेत. राम मंदिरासाठी देणगी स्वरुपात ऑनलाईन पैसे मागवले जात आहेत.

राम मंदिराच्या नावे सुरु असलेल्या गैरप्रकारांबाबत विश्व हिंदू परिषदेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'सायबर गुन्हेगारांनी जाळं टाकलं असून सोशल मीडियावर मेसेज टाकत लोकांकडून पैसे लुटले जात आहेत. मंदिराच्या नावावर देणगी मागण्याचे प्रकार सुरु आहेत. या मेसेजेसमध्ये QR कोड असतो आणि स्कॅन करुन पेमेंट करण्याचं आवाहन केलं जात आहे.'' अशी माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली.

Ayodhya Ram Mandir
Eknath Shinde: ..नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवणार काळे झेंडे; आदिवासी समाज आक्रमक

'विहिंप'चे प्रवक्ते विनोद बंसल म्हणाले की, या प्रकरणी गृह मंत्रालय, दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे. राम मंदिर निर्माणकार्य करणाऱ्या ट्रस्टने अशा प्रकारे पैशांची मदत मागितलेली नाही. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहिलं पाहिजे.

व्हिडीओमध्ये बंसल पुढे म्हणतात, आम्हाला काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या नावावर पैसे मागितले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मी गृह मंत्रालय, उत्तर प्रदेश पोलिस महासंचालक आणि दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Ayodhya Ram Mandir
CM Shinde : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

लोकांनी सावध रहावं- बंसल

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीने कोणालाही पैसे जमा करण्यासाठी नियुक्त केलेलं नाही. त्यामुळे काही ठग रामभक्तांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे आता जनतेनेही सतर्क राहावं. हा आनंदाचा सोहळा आहे त्यामुळे आम्ही निमंत्रण पाठवत आहोत. कुणाकडूनही दान घेतलं जात नाहीये, असं विनोद बंसल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.