भारतात व्यक्तिपूजा बऱ्याच प्रमाणात दिसून येते. आपल्या लाडक्या अभिनेत्यांची नेत्यांची मंदिरं उभारणं हे भारतीयांना काही नवीन नाही. या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत यांची मंदिरं देशात काही ठिकाणी आहेत. यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंदिराची भर पडली आहे.
अयोध्या गोरखपूर हायवेच्या कडेला भरतकुंड भागामध्ये योगी आदित्यनाथ यांचं हे मंदीर उभारण्यात आलं आहे. याच भरतकुंड भागात श्रीराम वनवासाला गेल्यानंतर १४ वर्षे त्यांचे बंधू भरतने त्यांच्या खडावा सिंहासनावर ठेवून अयोध्येचा राज्यकारभार पाहिला होता. याच ठिकाणी २०१४ पासून योगी आदित्यनाथ यांचे समर्थक बनलेल्या प्रभाकर मौर्य यांनी योगींचं मंदीर इथं बनवलं आहे.
प्रभाकर यांचं म्हणणं आहे की, ही त्यांची संकल्पपूर्ती आहे. अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर जे कोणी प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभारतील, त्यांचं मंदिर आपण उभारू असा संकल्प प्रभाकर यांनी केला होता. आता श्रीराम मंदिर बनत आहे, त्यामुळे त्यांचा हा संकल्प पूर्ण होत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या पाठपुराव्यामुळे हे मंदिर उभारलं जात आहे. त्यामुळे प्रभाकर यांनी आपला संकल्प पूर्ण करत योगी आदित्यनाथ यांचं मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
योगी आदित्यनाथांच्या या मंदिरातली मूर्ती त्यांच्याच उंचीएवढी म्हणजे ५ फूट ४ इंचाची आहे. योगी ज्या प्रकारचे कपडे परिधान करतात, तशीच वस्त्रं या मूर्तीला घालण्यात आली आहेत. ही मूर्ती तयार करण्यासाठी जवळपास २ महिने लागले आहेत. या मंदिरात योगी आदित्यनाथ यांची आरती आणि पूजा केली जाते. आरतीच्या वेळी प्रभाकर यांनी स्वतः त्यांच्यावर लिहिलेली गीते ऐकवली जातात. शिवाय, या मंदिराच्या प्रचार-प्रसारासाठी ऑडिओ, व्हिडीओ कॅसेट्सही तयार केल्या जात आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.