Ayodhya Ram Mandir : 'रामायण' मालिकेची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांच्या कुटुंबाला निमंत्रण नाही; प्रेम सागर म्हणाले...

रामजन्मभूमीचे स्वप्न साकार करण्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या 'रामायण' या ऐतिहासिक मालिकेची निर्मिती करणाऱ्या दिवंगत रामानंद सागर यांच्या कुटुंबाला अजूनपर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नाही.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir esakal
Updated on

मुंबई: अयोध्या येथील मंदिरात प्रभू रामाच्या प्रतिष्ठापनेला अवघे तीन दिवस उरले आहेत. रामजन्मभूमीचे स्वप्न साकार करण्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या 'रामायण' या ऐतिहासिक मालिकेची निर्मिती करणाऱ्या दिवंगत रामानंद सागर यांच्या कुटुंबाला अजूनपर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नाही. रामायणाला घरोघरी नेणाऱ्या रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यांनी 'सकाळ'शी बोलताना ही माहिती दिली.

''अजूनपर्यंत आम्हाला या सोहळ्याचे निमंत्रण आले नाही. मात्र त्याचे मला दुख वाटत नाही. निमंत्रण न मिळाल्यामुळे माझी रामभक्ती कमी थोडीच होणार आहे.'' असं प्रेम सागर यांनी सांगितलं.

प्रेम सागर यांनी कार्यालयात आणि त्यांच्या शेतात रामाची प्राणप्रतिष्ठा केली. काँग्रेस कार्यकाळात रामानंद सागर यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, मात्र त्यांचे काम बघता पुरस्कार देतांना झालेली चूक दुरुस्त करायला हवी होती. मात्र ती झाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

Ayodhya Ram Mandir
Vadodara Boat Capsized: वडोदऱ्यात मोठी दुर्घटना! नाव पलटल्यानं 10 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू
प्रेम सागर
प्रेम सागर

२५ जानेवारी १९८७ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेने एक इतिहास घडवला. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री दिवंगत विठ्ठलराव गाडगीळ यांनी या कल्पनेला विरोध केला होता. 'रामायण' छोट्या पडद्यावर आल्यास देशात हिंदुत्वाची सुप्त लाट तयार होईल आणि त्याचा फायदा त्यावेळी केवळ दोन खासदार असलेल्या भाजपला मिळेल, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी दोन वर्षे 'रामायण'चा प्रस्ताव अडकून ठेवला होता.

Ayodhya Ram Mandir
गरीबी कमी झाल्याचा मोदी सरकारचा दावा काँग्रेसने फेटाळला; आकडेवारीनुसार संदर्भ जुळत नसल्याचं स्पष्टीकरण

पुढे शाहबानो प्रकरणाने अडचणीत आलेल्या राजीव गांधी सरकारने या मालिका प्रसारित करण्यास मंजुरी दिली होती. या मालिकेमुळे देशात राममय वातावरण निर्माण झाले होते. अवघ्या काही आठवड्यात आठ कोटी दर्शक संख्येचा टप्पा गाठला. 'रामायण' मालिकेच्या लोकप्रियतेचा भाजपने चांगला वापर करुन घेतला होता. रामायणामुळे १९८४ मध्ये दोन खासदार असलेल्या भाजपने १९८९ पर्यंत ८५ जागांवर झेप घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.