Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir esakal

Ayodhya Ram Mandir : ''पाचशे वर्षांनंतर मनुवाद माघारी येतोय...'' राम मंदिरावरुन काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान?

अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ तारखेला होत आहे. मागील कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिर पूर्णत्वात जात असून उद्घाटन होणार आहे.
Published on

नवी दिल्लीः अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ तारखेला होत आहे. मागील कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंदिर पूर्णत्वात जात असून त्याचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते किंवा इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेबद्दल द्विधा निर्माण होतेय. त्यातच काँग्रेसच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केलंय.

काँग्रेस नेते उदित राज यांनी एक असं विधान केलंय ज्यामुळे पक्ष अडचणीत येऊ शकतो. राम मंदिराच्या निर्माणाला त्यांनी मनुवादाची वापसी, असं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करुन राम मंदिराबद्दल आपलं मत मांडलं.

Ayodhya Ram Mandir
Teacher Recruitment: शिक्षक भरतीच्या लढ्यात वनमंत्र्यांची उडी! अभियोग्यताधारकाला थेट कॉल, शिक्षणमंत्र्यांसोबत विशेष बैठक

उदित राज यांनी ट्वीट करत म्हटलं की, ''म्हणजे पाचशे वर्षांनंतर मनुवाद पुन्हा येत आहे.'' त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये राम मंदिर किंवा रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख केला नाही. परंतु पाचशे वर्षांच्या उल्लेखावरुन त्यांचा रोख राम मंदिराकडे असल्याचं लक्षात येतंय. 'लाईव्ह हिंदुस्थान'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले आहेत. परंतु पक्षाने अद्याप जाण्यासंदर्भातला निर्णय जाहीर केलेला नाही.

Ayodhya Ram Mandir
RPF: ‘मिशन जीवन रक्षक’ने वाचविला ४४ लोकांचा जीव! मध्य रेल्वेच्या आरपीएफची मोहीम, इतक्या कोटींचा मुद्देमाल मिळवला परत

जर काँग्रेस नेते अयोध्येला गेले नाहीत तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला ते आयते सापडतील. त्यातच उदित राज यांचं विधान आगीत तेल ओतण्यासारखं आहे. उदित राज यांनी २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर दिल्लीतून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात आपलाच पक्ष इंडियन जस्टिस पार्टीपासून केली होती. त्यांचं राम मंदिरावरील विधान काँग्रेसला अडचणीत आणू शकतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()