Ayodhya ram temple : अयोध्येत २२ तारखेला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. त्यापूर्वीच शुक्रवारी रामलल्लांच्या मूर्तीचा एका फोटो व्हायरल झाला होता.
चेहऱ्यावर गोड हास्य आणि भाळी टिळा.. अशा सुंदर मूर्तीचा फोटो सर्वांनी बघितला. मात्र त्या फोटोवरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या मुख्य पुजाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारीच्या सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्यातच शुक्रवारी रामलल्लांच्या मूर्तीचा एक फोटो व्हायरल झाला होता. सुरुवातीला रामलल्लांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर जो फोटो व्हायरल झाला होता त्यातील मूर्तींच्या डोळ्यांवर कसलीही पट्टी नव्हती.
याच फोटोवरुन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितलं की, प्राणप्रतिष्ठा पूर्ण होण्याच्या आधी प्रभू श्रीरांच्या डोळ्यांवरील पट्टी काढली जावू शकत नाही. मूर्तीमध्ये रामलल्लांचे डोळे दिसत असतील तर ते योग्य नाही. जर डोळे दिसत असतील तर ते कोणी दाखवले आणि मूर्तीचे फोटो कसे व्हायरल झाले, याची चौकशी झाली पाहिजे.
डोळे उघडे असणारी मूर्ती दाखवणं योग्य नाही- मुख्य पुजारी
राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितलं की, जिथे नवीन मूर्ती आहे तिथेच प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरु आहे. आता मूर्तीला कपड्यांनी झाकलेलं आहे. मूर्तीमध्ये डोळे उघडे दिसत आहेत, ते योग्य नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी नेत्र उघडले जाणार नाहीत. जर तेच छायाचित्र व्हायरल झालं असेल तर याची चौकशी केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.