Ayodhya Shri Ram Mandir : विशेष निमंत्रितांना निमंत्रणपत्रिका पोहोचल्या

‘श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या कार्यकर्त्यांच्या वतीने प्रत्यक्ष भेटून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण.
ayodhya ram mandir invitation cards
ayodhya ram mandir invitation cardssakal
Updated on

अयोध्या - अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ज्या सात हजार विशेष निमंत्रितांना निमंत्रण देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते, त्या सर्व निमंत्रितांची ‘श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांना निमंत्रण पत्रिका दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र’चे प्रतिनिधी त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद यांसह संघपरिवारातील विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मान्यवरांना प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका देण्यात सहभाग नोंदविला आहे. या मान्यवरांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि उद्योगपती गौतम अदानी यांसह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.

‘अंतराळ संशोधनापासून ते कालाक्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आमंत्रित केले आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचे मोठ्याप्रमाणात जाळे उभे केले असून प्रत्येक निमंत्रिताला प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका मिळेल याची योजना केलेली आहे.’ असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विविध समाजाच्या प्रमुखांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे सुमारे चार हजार साधूंनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे परदेशातील ५० जणांना देखील ट्रस्टच्या वतीने प्रत्यक्ष निमंत्रण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज यांनाही बोलावणे

खांडवा - मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील दृष्टिहीन गायक आणि कवी अकबर ताज यांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याबद्दल ताज यांनी आनंद व्यक्त केला असून, मी माझे सर्व कार्यक्रम रद्द करून अयोध्येमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दृष्टिहीन असलेल्या ताज यांनी प्रभू श्रीरामावर अनेक गीते आणि भजने लिहिली आणि गायली आहेत.

सीतेच्या मूर्तीसाठी सुरतहून साडी

सुरत - अयोध्येमध्ये २२ जानेवारीला होणाऱ्या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देवी सीतेच्या मूर्तीसाठी गुजरातमधून खास साडी पाठविण्यात येणार आहे. सूरत येथे या साडीची निर्मिती करण्यात आली आहे. या साडीवर अयोध्येतील राम मंदिर आणि रामाचे चित्र साकारले असल्याची माहिती या साडीच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेले उद्योगपती ललित शर्मा यांनी दिली. उद्योगपती राकेश जैन यांनी या साडीची निर्मिती केली आहे. ही साडी अयोध्येला लवकरच पाठविणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

‘राम भक्तीवर स्वामित्व हक्क नाही’

‘‘राम भक्तीवर केवळ आमचाच स्वामित्व हक्क नाही, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही हे ट्रस्टने ठरवले आहे ’’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे. उमा भारती म्हणाल्या, ‘‘मी विरोधकांना आवाहन करते की, सोहळ्याला उपस्थित राहिल्यास आपली मते जातील अशी भीती वाटून घेऊ नका. या सोहळ्याला उपस्थित राहा आणि मी भाजपच्या सदस्यांनाही आवाहन करते की, केवळ आपणच राम भक्ती करत आहोत या अहंकारात राहू नका.’'

अखेर आपण सर्व हिंदूच - शिवकुमार

तिरुअनंतपुरम - ‘अखेर आम्ही सर्व हिंदू आहोत’ असे म्हणत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अयोध्येतील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कर्नाटक सरकारच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे सोमवारी समर्थन केले.केरळ दौऱ्यावर असलेल्या शिवकुमार यांनी तिरुअनंतपुरम येथील विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला.

दरम्यान, काँग्रेस पक्षश्रेष्ठी हे अयोध्येतील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय का घेण्यात आलेला नाही असे विचारले असता शिवकुमार म्हणाले, ‘केंद्रातील भाजप सरकार हे या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचे आणि कोणाला बोलवायचे नाही हे ठरवत आहेत. मात्र ही त्यांची खासगी मालमत्ता नाही. हे सर्वांचे आहे.’ आमचे सरकार लोकभावनांचा आदर करते, असे प्रतिपानही त्यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()