Shri Ram Temple : रामलल्लासाठी सुवर्ण सिंहासनाचा थाट

अयोध्येतील भव्यदिव्य अशा राम मंदिरामध्ये आठ फूट उंचीच्या सुवर्ण सिंहासनावर रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार असल्याची माहिती ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडून देण्यात आली आहे.
ayodhya Shri Ram idol
ayodhya Shri Ram idolsakal
Updated on

अयोध्या - अयोध्येतील भव्यदिव्य अशा राम मंदिरामध्ये आठ फूट उंचीच्या सुवर्ण सिंहासनावर रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार असल्याची माहिती ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडून देण्यात आली आहे. हे देखणे सिंहासन राजस्थानातील कारागिरांनी तयार केले असून ते येत्या १५ डिसेंबर रोजी अयोध्येत पोचणार आहे, असे विश्वस्त मंडळाचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले.

या मंदिराच्या तळमजल्याचे काम हे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार असून त्याचे ऐंशी टक्के काम हे आधीच पूर्ण झाले असल्याचे मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आले. पहिल्या मजल्यावरील सतरा खांबांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून अन्य फक्त दोन खांब उभारणेच शिल्लक राहिले आहेत.

पहिल्या मजल्यावरील थराच्या उभारणीचे काम हे येत्या १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून परिक्रमा मार्गाच्या उभारणीचे आणि त्यावर मार्बल बसविण्याचे काम मात्र पूर्ण झाले आहे. गृह मंडपामध्ये मार्बल बसविण्याची प्रक्रिया मात्र अद्याप सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या केंद्रावरील छपराच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून राम मंदिराच्या बाहेरील दरवाजाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून ते देखील नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

सोने वितळविणार

या भव्यदिव्य अशा राम मंदिराच्या निर्मितीसाठी देशभरातील भाविकांनी सोन्या चांदीच्या शेकडो वस्तू दान केल्या असून त्या साठवून ठेवणे शक्य नसल्याने वितळविल्या जाणार आहेत. देशातील मान्यवर संस्थांच्या मार्गदर्शनाखाली हे सोने वितळविले जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

सिंहासनाची रचना

  • ८ फूट उंची

  • ३ फूट लांबी

  • ४ फूट रुंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.