नवी दिल्ली : सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य सुविधा देणाऱ्या या योजनेचा उच्च व मध्यम वर्गासह सर्व वर्गांतील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ होणार आहे. याशिवाय, जलविद्युत निर्मितीला आर्थिक बळ देतानाच इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ योजनेलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.