यंदा देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे होत आहे. या तयारीसाठी केंद्र सरकारने जानेवारीपासूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित जिल्ह्यांना विशेष सजवण्यात येत आहे. दरम्यान, 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशातील वातावरण देशभक्तीमय करण्यात येत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी तिरंगा फडकवण्याची मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासाठी विषेश तयारी केली असल्याचे चित्र दिसत आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनापूर्वीच उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तिरंग्यातील रंगाच्या मिठाईची विक्री सुरु झाली आहे. लखनऊच्या मोठ्या मिठाई निर्मात्यांनी तीन रंगात दहा पेक्षा जास्त प्रकारची मिठाई तयार केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याच्या रंगात दहा प्रकारची मिठाई तयार करण्यात आली आहे. यामध्ये तिरंगा बर्फी, तिरंगा घेवर, तिरंगा लाडू आणि तिरंगा पेठा यांचा समावेश आहे. तिरंगा मिठाई ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
लखनऊसह कानपूर, मेरठ, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर आणि बरेलीसह अनेक शहरांमध्येही रक्षाबंधनाचा माहोलही तिरंगामय झाला आहे. लखनऊमध्ये चांदीच्या तिरंग्याच्या राखीची विक्री होत असून ग्राहकांनी यासाठी पसंती दर्शवली आहे. दरम्यान, आझादीच्या अमृत महोत्सवात उत्तर प्रदेशातील कैद्यांचाही मोठा वाटा असणार आहे. आजकाल कैदी तिरंगा ध्वज बनवण्यात व्यस्त असून, स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हे तिरंगे ध्वज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. तुरुंगांमध्ये दोन लाखांहून अधिक राष्ट्रध्वज बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.