'बाबा का ढाबा'च्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

'बाबा का ढाबा'च्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न
Updated on

नवी दिल्ली : एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून संपूर्ण देशात रातोरात प्रसिद्धीस पावलेल्या 'बाबा का ढाबा' चालवणाऱ्या आजोबांबाबत सध्या समोर आलेली माहिती हैराण करणारी आहे. बाबा का ढाबा चालवणारे कांता प्रसाद यांना आज शुक्रवारी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. असं म्हटलं जातंय की, ते गेल्या काही दिवसांपासूनच मानसिक तणावाखाली होते आणि त्यांनी याच तणावाखाली झोपेच्या गोळ्या खाल्या आहेत.

'बाबा का ढाबा'च्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न
उत्तर प्रदेश पोलिसांची 'Twitter'च्या प्रमुखांना नोटीस

दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापूर्वी दारूच्या सेवनामुळे तसेच झोपेच्या गोळ्यांमुळे ते बेशुद्ध अवस्थेत होते. झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यानंतर त्यांना सफदरगंज हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. कांता प्रसाद यांची तब्येत सध्या स्थिर आहे. ते सध्या हॉस्पिटलमधील आयसीयू युनिट- 2 मध्ये व्हेंटीलेटरवर आहेत.

'बाबा का ढाबा'च्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न
वाहनधारकांनो! लायसन, नोंदणी कागदपत्रांबाबत केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

कांता प्रसाद यांची पत्नी बदामी देवी यांनी म्हटलंय की, मला काहीचा माहिती नाहीये. त्यांनी काय खाल्लय याबाबत मला कल्पना नाही. मी पाहिलं नाही. ते बेशुद्ध पडले तेंव्हा मी ढाब्यावर बसले होते. मी त्यांना इथं आणलंय. डॉक्टरांनी अद्याप काहीच सांगितलं नाहीये. त्यांच्या मनात काय सुरु होतं याबाबत काहीच माहिती नाही.

गेल्या वर्षी गौरव नावाच्या एका युट्यूबरने कांता प्रसाद यांच्या 'बाबा का ढाबा' चा व्हिडीओ बनवून लोकांना त्यांची मदत करण्यासाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर रातोरात कांता प्रसाद यांचा हा ढाबा प्रसिद्धीस आला होता. कांता प्रसाद यांना संपूर्ण देशातून मदत मिळाली होती. त्यानंतर काही दिवसांतच कांता प्रसाद यांनी युट्यूबरवरच फसवणूकीचा आरोप लावला होता. त्यानंतर त्यांनी त्याबद्दल माफी देखील मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.