Petrol-Diesel दरवाढीबद्दल प्रश्न विचारताच बाबा राम देव संतापले

बाबा रामदेव यांनी पत्रकारावर संताप व्यक्त केला.
Ram dev Baba
Ram dev BabaTeam eSakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून सतत इंधनाचे दर वाढत आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर इंधन दरवाढ होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार ही दरवाढ झाल्याचं दिसून येतंय. पेट्रोल डिझेलचे भाव ३ रुपयांपेक्षा जास्त वाढले असून, त्यामुळे सर्व सामान्यांना फटका बसला आहे. या प्रश्नावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून, सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर आता योग गुरु बाबा राम देव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पेट्रोल डिझेलच्या भाव वाढीबद्दल पत्रकाराने केलेल्या प्रश्नामुळे राम देव बाब संतापल्याचं पाहायला मिळालं.

Ram dev Baba
इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसच्या खासदारांचा ठिय्या, विजय चौकात धरणे

एका कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने बाबा रामदेव यांना मीडियातील त्यांच्या एका विधानाबाबत प्रश्न विचारला. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, पेट्रोल 40 रुपये आणि प्रति सिलेंडर 300 रुपये देणाऱ्या सरकारचा लोकांनी विचार करावा. महागाईच्या मुद्यावरून काँग्रेसच्या विरोध करत भाजपला समर्थन देणाऱ्या रामदेव बाबांना पत्रकाराने प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले.

Ram dev Baba
Video: 10 दिवसात नवव्यांदा इंधन दरवाढ
Ram dev Baba
कर्नल किरोरी सिंह बैंसला यांचं निधन; गुर्जर चळवळीचा मोठा चेहरा हरपला

यावर रामदेव म्हणाले, "हो, मी बोललो होतो, तुम्ही काय करू करणार? असे प्रश्न विचारू नका. तुम्ही काहीही विचाराल आणि मी त्यावर उत्तर द्यायला मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा ठेकेदार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जेव्हा पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला आणि सांगितलं की, तुम्ही सर्व टीव्ही चॅनेल्सवर असे बाइट्स दिले आहेत. तेव्हा पत्रकाराकडे बोट दाखवत रामदेव म्हणाले, "मी दिले आणि आता देत नाही. जे करायचंय ते करून घे. गप्प बस. पुन्हा विचारलं तर ते बरोबर होणार नाही. एकदा सांगितलं. बस्स. एवढा उद्धटपणा नको." असं राम देव बाबा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.