Baba Ram Rahim Acquitted: बाबा राम रहिमची खून प्रकरणातून सुटका; हायकोर्टाकडून दिलासा पण...

राम रहिमची सुटका होणार की नाही? जाणून घ्या
Ram Rahim
Ram Rahim
Updated on

चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु गुरमित राम रहिम याची २००२ मधील खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं हा निकाल दिला आहे. पण असं असलं तरी राम रहिम अद्याप तुरुंगातच राहणार आहे. कारण इतर खटल्यांमध्ये त्याला २० वर्षांची शिक्षा झालेली आहे. (Baba Ram Rahim acquitted in 2002 murder case big relief from Punjab and Haryana High Court)

डेराचा मॅनेजर रणजित सिंग याची २००२ मध्ये हत्या करण्यात आली होती. या आरोपातून हायकोर्टानं राम रहिमला मुक्त केलं आहे. याप्रकरणात सीबीआय कोर्टानं त्याला २०२१ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच ३१ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

Ram Rahim
Pune Porsche Accident: "अजित पवारांचा फोन जप्त करुन नार्को टेस्ट करा"; अंजली दमानिया यांची मागणी

पण हायकोर्टाच्या या निर्णयानंतरही राम रहिम हा रोहतकच्या सुनारिया तुरुंगातच असणार आहे. कारण इतर खूनाच्या प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, यामध्ये २००२ मध्ये पत्रकार राम चंदर छत्रपती यांच्या खुनाचा समावेश आहे. तर दोन त्याच्या शिष्य महिलांवर बलात्कार केल्याचा आरोपात तो दोषी आढळला आहे. या दोन गुन्ह्यांमध्ये सध्या राम रहिम २० वर्षांची शिक्षा भोगत आहे.

Ram Rahim
Mizoram Mine Collapse : मिझोराममध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना! खाण कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू, मदत आणि बचावकार्य सुरू

वर्षभरात तुरुंगात आत-बाहेर केलं

२०१७ मध्ये शिक्षा सुनावल्यानंतर राम रहिम अनेकदा बातम्यांमध्ये आला आहे. त्याला अनेकदा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. गेल्या चार वर्षात त्याला ९ वेळा पॅरोल मंजूर करण्यात आले होते. सर्वाधिक पॅरोल राम रहिमला मंजुर झाल्यानं त्यावरही हायकोर्टानं हरयाणा सरकारला झापलं होतं. तसेच त्याला पॅऱोल मंजूर करण्यापूर्वी हायकोर्टाची मंजुरी घ्यावी असे आदेश देण्यात आले होते.

विविध कारणांसाठी त्याला पॅरोल मंजूर करण्यात आले होते. आई आजारी असल्यानं त्याला पॅरोल मंजूर झाला होता. दरम्यान, पॅरोलवर सुटल्यानंतर त्यानं दोन वेळा आपला सत्संगही भरवल्याचं समोर आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()