'जाहिराती उत्साहात दिल्या, जनतेची माफी मागायला तयार'; रामदेव यांच्या बिनशर्त माफीनंतरही कोर्ट समाधानी नाही!

Baba Ramdev Patanjali: पतंजली आयुर्वेदचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव यांनी जनतेची माफी मागण्याची तयारी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव समोर ठेवला आहे.
Baba Ramdev
Baba Ramdevsakal
Updated on

नवी दिल्ली- पतंजली आयुर्वेदचे प्रमुख योगगुरु बाबा रामदेव यांनी जनतेची माफी मागण्याची तयारी केली आहे. त्यांनी यासंदर्भातील प्रस्ताव समोर ठेवला आहे. पतंजलीकडून दिशाभूल करण्यात आलेल्या जाहिरातीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली. यावेळी बाबा रामदेव यांच्या वकिलांनी हा प्रस्ताव कोर्टासमोर ठेवला आहे. (Baba Ramdev Acharya Balkrishna Personally Apologies To Supreme Court Patanjali ready to Public)

सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना एक आठवड्याचा वेळ दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी पार पडणार आहे. बाबा रामदेव यांची बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी म्हणाले की, ते जनतेची माफी मागण्यास तयार आहेत. आम्हाला खेद व्यक्त करायचा आहे. कारण जे झालं ते चुकीचं होतं.

Baba Ramdev
Sakal Podcast : सुप्रीम कोर्टाने 'पतंजली'ला फटकारले ते राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

रामदेव बाबा यांची सुप्रीम कोर्टात माफी

बाबा रामदेव यांची बाजू मांडताना वकील म्हणाले की, त्या जाहिराती उत्साहात दिल्या गेल्या होत्या. आम्ही तसं करायला नको होतं. यापुढे आम्ही तसं करणार नाही. आम्ही आमच्या कृत्याचे समर्थन करत नाही. आम्ही माफी मागतोय. आचार्य बाळकृष्ण यावेळी म्हणाले की, कायदेशीर दृष्टीने आम्ही तसं करायला नको होतं.

Baba Ramdev
Viral Video: संसद आहे की कुस्तीचा आखाडा? खासदाराने सत्ताधारी नेत्याला लगावले ठोसे; जाणून घ्या कारण

सुप्रीम कोर्टाच्या वकील हिमा कोहली यांनी बाबा रामदेव यांना विचारलं की, तुम्ही जे केलं आहे. ते कोर्टाच्या विरोधात केलं आहे. हे योग्य होतं का? यावर बाबा रामदेव म्हणाले की, न्यायमूर्ती साहेब, मी इतकंच सांगेन की आमच्याकडून चूक झाली आहे. यासाठी आम्ही बिनशर्त माफी मागतो. यावर न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाल्या की, तु्म्ही पत्रकार परिषद घेतली. त्यात तुम्ही एलोपॅथीबाबत प्रश्न उपस्थित केले. आपल्या देशात अनेक पद्धतींचा वापर केला जातो. त्यातील एक आयुर्वेद आहे.

कोरोना काळात केलेल्या खोट्या जाहिराती आणि दाव्यांप्रकरणी बाबा रामदेव हे अडचणीत आले आहे. कोरोना बरे करणारे औषध आपल्याकडे असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. त्यांच्याविरोधात वैद्यकीय संस्थेने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने रामदेव यांना फटकारले आहे. तुमचा जुना इतिहास चांगला नाही. तुम्ही वारंवार कोर्टाची अवहेलना केली आहे, असं कोर्ट म्हणालं. (Baba Ramdev News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.