महागाईच्या प्रश्नावर भडकले रामदेव बाबा; म्हणाले, "चुप हो जा, आगे पुछेगा तो…"

baba Ramdev got angry over questions about petrol diesel and lpg prices video goes viral
baba Ramdev got angry over questions about petrol diesel and lpg prices video goes viral
Updated on

सध्या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे सामन्यांच्या खिशावर मोठा आर्थिक बोजा पडत आहेत, यादरम्यान योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांना त्यांच्या पेट्रोल-डिझेल तसेच सिलेंडरच्या किंमतीबद्दल त्यांच्या जुन्या विधानांची आठवण करुन देत प्रश्न विचारले असता ते मीडियाच्या प्रश्नांवर भडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इतकेच नाही तर 'गप्प बस, आता पुढे विचारशील तर ते योग्य होणार नाही' असा दम देखील दिला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारलं की, तुम्ही टिव्ही चॅनलवर सांगितलं होतं की, तुम्हाला कोणतं सरकार हवं पेट्रोल-डिझेल 40 रुपये प्रतिलिटर आणि एलपीजी सिलिंडर 300 सरकार.. यावर रामदेव बाबा म्हणाले की तुझे प्रश्न खूप झाले.. हो, मी म्हणालो होतो, पूंछ पडेगा मेरी? यावर पत्रकराने पुढचा प्रश्न विचारला की तुमची कंपनी पतंजली जगप्रसिद्ध आहे… तर रामदेव मधेच अडवून म्हणाले, 'असे प्रश्न विचारू नका. तुम्ही जे विचाराल त्याची उत्तरे देण्यासाठी तुम्ही काय ठेकेदार आहेत का? की तुम्ही विचाराल त्याचे उत्तर मी देऊ.. थोडं सुसंस्कृत व्हायला शिका.

baba Ramdev got angry over questions about petrol diesel and lpg prices video goes viral
शाहबाज शरीफ कोण आहेत? पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी नाव चर्चेत

यानंतर पत्रकाराने पुढे विचारले की, तुम्ही टिव्ही चॅनलवर तुमची बाईट चालली होती, तर यावर रामदेव म्हणाले, 'हो, मी दिली होती बाईच. आता नाही देत.. कर काय करायचं ते. गप्प बस, आता पुढे विचारशील तर ते योग्य होणार नाही. असे देखील ते म्हणाले.

baba Ramdev got angry over questions about petrol diesel and lpg prices video goes viral
रेडमीचे तीन नवे स्वस्तात मस्त 5G फोन लॉंच; पाहा किंमती अन् फीचर्स

दरम्यान हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत मंत्री नितीन राऊत यांनी " टीव्हीवर रागावर नियंत्रण ठेवण्याचे ज्ञान देतात. समोरच्याने प्रश्न विचारला तर ब्लड प्रेशर हाई जात आहे. बाबा तेरे रूप अनेक..." असा टोला लगावला आहे. देशात विधानसभा निवडणूका झाल्यानंतर देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. यामुळे सामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.