Baba Ramdev: वैद्यकीय स्वातंत्र्य अद्यापही स्वप्नच! बाबा रामदेवांची पुन्हा अ‍ॅलोपॅथीवर टीका, म्हणाले, करोडो लोक...

अॅलोपॅथीवर टीका केल्याप्रकरणी बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टानं चांगलंच झापलं होतं, यासाठी त्यांना माफी देखील मागावी लागली होती.
Baba Ramdev Patanjali
Baba Ramdev Patanjali
Updated on

नवी दिल्ली : आपल्याकडं अद्यापही वैद्यकीय स्वातंत्र्य हे मोठं स्वप्नच आहे. कारण अॅलोपॅथीची विषारी औषधे खाऊन कोट्यवधी लोक दरवर्षी मरत आहेत, असं विधान योगगुरु बाब रामदेव यांनी केलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार इथं माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. पण यामध्ये त्यांनी अॅलोपॅथीवर आरोप केल्यानं पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.

रामदेव पुढे म्हणाले, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्वाचा वैचारिक घुसळण सुरु आहे. हे भारताची मुलं आणि तरुणांना उद्ध्वस्त करणार आहे. लोकांमध्ये ही वासना वाढते आहे. त्याचबरोबर बलात्कार आणि सामुहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत. याचं एक कारण म्हणजे आपण योगापासून दुरावत आहोत. देशभरात सध्या ‘तांडव’ सुरू आहे.

Baba Ramdev Patanjali
Allahabad High Court: पित्याला अविवाहित मुलींचं पालन-पोषण करावचं लागेल! हायकोर्टाचा महत्वाचा निकाल

भारत हा संन्यासींचा देश आहे आणि जेव्हा आपण इथं सामूहिक बलात्कारासारख्या घटना पाहतो तेव्हा आपण हादरून जातो. त्यामुळे 78व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पतंजलीनं वचन दिलं आहे की, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक, वैचारिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यासोबतच आम्ही या देशाला रोग, मादक पदार्थ आणि लालसेपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मदत करू"

Baba Ramdev Patanjali
PM Modi Speech: 'डिझाईन इंडिया' ते 'सेक्युलर सिव्हिल कोड'; PM मोदींच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे जाणून घ्या

बांगलादेशात, श्रीलंकेत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांमध्ये जे गृहयुद्ध भडकले आहेत तसं भारतात होऊ नये म्हणून लहान मुलांवर आपण तसे संस्कार केले पाहिजेत, असंही बाबा रामदेव यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.