नवी दिल्ली : अॅलोपॅथी (allopathy) या आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीवर सडकून टीका केल्याने योगगुरु बाबा रामदेव (Radev baba) यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) यावरुन आक्रमक पवित्रा घेत रामदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मध्यस्थाची भूमिक पार पाडली त्यानंतर रामदेव यांनी माफी मागितली होती. यानंतर रामदेव यांनी पुन्हा एकदा IMA आणि फार्मा कंपन्यांना (Farma companies) टार्गेट केलं आहे. यांना खुलं पत्र लिहित रामदेव यांनी थेट २५ प्रश्न विचारले आहेत. (Baba Ramdevs open letter to IMA and pharma companies Asked 25 questions)
उच्च रक्तदाब, मधुमेह या समस्यांवर अॅलोपॅथीकडे कायमस्वरुपीचे काय उपचार आहेत? तसेच थायरॉईड, आर्थरायटिस, कोलायटिस आणि दमा यांसारख्या आजारांवर औषध तयार करणाऱ्या फार्मा कंपन्यांकडे कायमस्वरुपी औषधं आहेत का? असे प्रश्न रामदेव यांनी विचारले आहेत. जर अॅलोपॅथीला २०० वर्षे झाली असतील तर या उपचार पद्धतीमध्ये फॅटी लिव्हर, लिव्हर सोरायसिस, हेपॅटायटिस आणि क्षयरोग हे आजार कायमस्वरुपी बरे करणारे उपचार आहेत का? असंही त्यांनी विचारलं आहे.
फार्मा इंडस्ट्रीकडे हृदयातील ब्लॉकेजेस संपवण्याची औषधं आहेत का? विना बायपास शस्रक्रिया, विना शस्त्रक्रिया आणि अँजिप्लास्टी टाळण्यासाठी काही कायमस्वरुपाची औषधं आहेत का? विना पेसमेकर हृदयाचं कार्य सुरळीत चालावं यासाठी या क्षेत्राकडं कुठले उपचार आहेत? कोलेस्ट्रॉल आणि किडनी संबंधी साईड इफेक्टवर अॅलोपॅथीमध्ये काय उपचार आहेत? असेही काही महत्वाचे प्रश्न बाबा रामदेव यांनी उपस्थित केले आहेत.
जर व्यक्ती खूपच हिंसक, क्रूर आणि हिंस्र पद्धतीनं वागत असेल तर त्याला माणसात आणण्यासाठी अॅलोपॅथीमध्ये काय उपचार आहेत? तसेच एखाद्या व्यसनी व्यक्ती नशा करत असेल तर त्याला यातून बाहेर काढण्यासाठी काही कायमस्वरुपाचे उपचार आहेत का? अॅलोपॅथी आणि आयुर्वेद यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी फार्मा कंपन्यांकडे कोणत औषध आहे का? विना ऑक्सिजन सिलेंडर रुग्णाच्या शरीरात ऑक्सिजन वाढवण्याचे फार्मा कंपन्यांकडे कोणतं औषध आहे? जर अॅलोपॅथी सर्वगुणसंपन्न असेल तर अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी आजारीच पडता कामा नये, असे काही आश्चर्यकारक प्रश्नही बाबा रामदेव यांनी उपस्थित केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.