Babri Masjid : तीस वर्षांपूर्वी 'पाचला पाच कमी' असतानाच अयोध्येत वेगळंच काही तरी घडत होतं

अयोध्येत राम मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच हे मंदीर सामान्य भक्तांसाठी सुरू केले जाणार आहे.
Babri Masjid
Babri Masjid Sakal
Updated on

Babri Masjid : अयोध्येत राम मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच हे मंदीर सामान्य भक्तांसाठी सुरू केले जाणार आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून आयोध्येत राम मंदीर आणि बाबरी मशीद वाद न्यायालयात सुरू होता. त्यानंतर न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर येथे भव्य राम मंदीर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Babri Masjid
अयोध्या श्री राम मंदीर निर्मिती : 22 कोटींचे चेक बाऊंस, तर 15 हजार चेक रिटर्न

मात्र, आजच्याच दिवशी म्हणजे ६ डिसेंबर १९९२ रोजी तीस वर्षांपूर्वी अयोध्येतील वादग्रस्त मशीदीचा भाग पाडण्यात आला. या घटनेवेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांची सत्ता होती. सहा डिसेंबर १९९२ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास लाखो कारसेवक अयोध्येत जमा होण्यास सुरूवात झाली होती.

Babri Masjid
Swasthyam 2022 : ‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?ध्यान, प्राणायाम व योगसाधनेविषयी जाणून घ्या सगळं

दुपारी साधारण बाराच्या सुमारास कारसेवकांच्या एक मोठ्या गटाने मशिदीच्या भिंतीवर चढाई करण्यास सुरूवात केली. जमलेली गर्दी लाखोंच्या संख्येत असल्याने ती नियंत्रणात ठेवणे कठीण झाले होते. त्यानंतर दुपारी मशिदीचा पहिला घुमट कारसेवकांनी ३ वाजून ४० मिनिटांनी तोडला त्यानंतर पाच वाजण्यास केवळ ५ मिनिटे बाकी असताना कारसेवकांनी मशिदीची संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त केली. एवढेच नव्हे तर जमावाने त्याच ठिकाणी पूजा करून ‘राम शिला’ स्थापन केली.

Babri Masjid
Swasthyam 2022 : मानसिक फिटनेस योगाच्या माध्यमातून कसा साधला जाऊ शकतो?

हा सर्व प्रकार सुरू असताना घटनास्थळावरील कारसेवकांना रोखण्याचे धाडस कुणीच करत नव्हते. एवढेच नव्हे तर, कारसेवकांवर गोळीबार होणार नाही, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी दिले होते.यानंतरच देशभरात जातीय दंगलींना सुरूवात झाली यामध्ये सुमारे २००० लोकांना आपला जीव गमवावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.