Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींसाठी जंतर-मंतरवर धर्मसंसद; युथ मुस्लीम संघाचा पाठिंबा

Bageshwar Dham Dhirendra Shastri
Bageshwar Dham Dhirendra Shastriesakal
Updated on

नवी दिल्ली - बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या खूप चर्चेत आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या सर्व पार्श्वभूमीवर रविवारी (५ फेब्रुवारी) दिल्लीतील जंतरमंतरवर बाबा बागेश्वर यांच्या समर्थनार्थ धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासंदर्भात एक पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. (Bageshwar Dham news in Marathi)

Bageshwar Dham Dhirendra Shastri
Accident News : भीषण अपघात! रस्त्यावरून चालणाऱ्या कामगारांना ट्रकने चिरडलं; तीन ठार

बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री यांनी सनातन धर्माविषयी एका निवेदनात म्हटले होते की, भारत एक हिंदु राष्ट्र आहे आणि हिंदु राष्ट्र राहील, फक्त घोषणेची गरज आहे. धीरेंद्र शास्त्रींच्या या विधानाला अनेक साधू-संतांनी पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यात मोठ्या संख्येने साधू-संत सहभागी होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर युथ मुस्लीम असोसिएशन ऑफ कटनीच्या सदस्यांनीही बागेश्वर बाबांना पाठिंबा देत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या नावाने एसडीएमला निवेदन दिले आहे. युथ मुस्लिम असोसिएशनचे अध्यक्ष अर्शद मन्सूरी यांनी निवेदनात म्हटले की, आमचा संपूर्ण देश संतांचा आहे, आम्ही संतांचा आदर करतो आणि जर कोणी संतांवर भाष्य केले तर त्याला सोडणार नाही. आम्ही बागेश्वर धामच्या पाठीशी असून देशातील साधू-संतांच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात युवा मुस्लिम संघ आंदोलन करेल आणि रस्त्यावरही उतरेल, असही ते म्हणाले.

Bageshwar Dham Dhirendra Shastri
Kasba-Chinchwad Bypoll : तेव्हा फडणवीसांनी माझं ऐकलं, आता तुम्ही ऐका; राज ठाकरेंच मविआला आवाहन

प्रयागराजच्या संगमावरील माघ मेळाव्यात बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, आपण सर्व एकत्र असलो तर भारत हिंदु राष्ट्र होईल. आता हिंदु राष्ट्राचे बिगुल वाजवा. जातीवाद मोडून सर्व हिंदूंना एकत्र आणूया. मी ना राजकारणी आहे, ना राजकारण करतो, ना माध्यमांनी दखल घ्यावी म्हणून हिंदु राष्ट्राबद्दल बोलतो. मी इथून फक्त प्रार्थना करतोय. ही प्रार्थना हिंदु राष्ट्रासाठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.