Bageshwar Dham : मोठी बातमी! बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या भावाला अटक; पोलिसांवर होता दबाव

शालिग्राम यानं दारूच्या नशेत लग्नात प्रचंड गोंधळ घातला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Dhirendra Shastri brother Shaligram Garg arrested Chhatarpur Police
Dhirendra Shastri brother Shaligram Garg arrested Chhatarpur Policeesakal
Updated on
Summary

शालिग्राम गर्गच्या अटकेच्या मागणीसाठी भीम आर्मीनंही धरणे आंदोलन केलं होतं.

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham Dhirendra Shastri) यांचा भाऊ शालिग्राम गर्ग (Shaligram Garg) याला छतरपूर पोलिसांनी आज (गुरुवार) अटक केली. आरोपीला अटक करून छतरपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलंय.

11 फेब्रुवारीला बमिठा येथील गढा गावात एका दलित कुटुंबातील मुलीचा विवाह होता. पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम यानं दारूच्या नशेत लग्नात प्रचंड गोंधळ घातला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो हातात पिस्तुल आणि तोंडात सिगारेट घेऊन गोंधळ घालताना दिसला.

Dhirendra Shastri brother Shaligram Garg arrested Chhatarpur Police
Assembly Election : PM मोदींचं 'ते' भाकित खरं ठरलं; त्रिपुरासह 'या' राज्यांत भाजपला झाला मोठा फायदा

धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला अटक करण्यासाठी छतरपूर पोलिसांवर (Chhatarpur Police) प्रचंड दबाव होता. शालिग्रामच्या अटकेच्या मागणीसाठी दलित संघटना सातत्यानं आंदोलन करत होत्या. गावातील वातावरणही पूर्णपणे तंग झालं होतं. प्रचंड वादानंतर धीरेंद्र शास्त्री यांनीही भावापासून फारकत घेतली होती. प्रत्येक प्रकरणात आपलं नाव ओढण्याची गरज नाही, असं निवेदन त्यांनी जारी केलं होतं.

Dhirendra Shastri brother Shaligram Garg arrested Chhatarpur Police
Assembly Election : 'या' राज्यात घडला इतिहास; तब्बल 60 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडून आली महिला उमेदवार

छतरपूरचे एसपी सचिन शर्मा यांनी या प्रकरणी एक निवेदन जारी केलं होतं की, 'पोलीस लवकरच या प्रकरणी अहवाल सादर करेल. आता शालिग्राम गर्ग याला अटक करण्यात आलीये. न्यायालयाच्या भूमिकेकडं आमचं लक्ष असणार आहे. न्यायालय काय निर्णय देतं हे पाहावं लागेल.' शालिग्रामनं लग्नाच्या कार्यक्रमात पिस्तुल घेऊन गोंधळ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावरही टीका होऊ लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.