Dhirendra Krushna Shashtri News
धीरेंद्र महाराज हे आपल्या समोर उपस्थित कोणाच्याही वैयक्तिक बाबींची माहिती सांगतात. एखाद्याच्या घरातील कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात काय ठेवलंय हे ही आपण सांगतो, असा दावाही ते करतात.
मात्र ही केवळ दिशाभूल असून हा प्रकार टेलिपथी आणि इंट्युशनचा आहे, असं श्याम मानव सांगतात. तसेच दावे करताना आधीच आपल्या यंत्रणेद्वारे संबंधीत व्यक्तीची माहिती गोळा केली जाते, असे दावे करणाऱ्या अनेक बाबांचा आम्ही पर्दाफाश केल्याचंही मानव यांनी म्हटलं आहे.
हा वाद आता चांगलाच पेटला आहे. काल भोपाळमध्ये संत-महंतांची बैठक झाली. त्यामध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या समर्थनार्थ ५० हजार संत रस्त्यावर उतरतील, अशा इशारा देण्यात आलाय. तर काल ट्विटरवरही हे शास्त्री ट्रेंडिंगमध्ये होते.
आज धीरेंद्र शास्त्रींनी एक व्हीडिओ जारी केला आहे. ते म्हणाले की, नागपूरच्या प्रकरणामध्ये आम्ही श्याम मानव यांना विचारतो की, ते आपल्या पादरींवर का बोट उचलत नाहीत. ते जे धर्मांतर करतात, ते कसं चालतं?
हेही वाचाः प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
'बागेश्वर धाम'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन धीरेंद्र शास्त्रींनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये पुढे म्हटलं आहे की, आम्हाला या विषयामध्ये जास्त लक्ष घालण्याची गरज नाही. जेव्हापासून सनातन धर्मासाठी घरवापसीचा मुद्दा उचलला तेव्हापासून अशी षड्यंत्र सुरु आहेत. आम्हाला थांबायचं नाहीये पुढे जायचं आहे.
'लोकांना एवढं सांगायचं आही की, त्यांना सक्रीयपणे काम वाढवायचं आहे. नागपूर मुद्द्यावर त्यांनी आपल्याला कायदेशीर आव्हान दिलेलं नाही. परंतु समितीच्या अध्यक्षांनी त्यांच्या पादरींवरही बोलावं, ते धर्मांतर करतात तरी त्यांच्यावर कुणी बोलत नाही.आम्ही कधीच अंधश्रद्धा पसरवत नाहीत.'
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, आम्ही देवाची प्रार्थना करतो त्यामुळे कुणाचं कल्याण होत असेल तर तो चमत्कार कसा? प्रार्थना करणं जादू-टोना असेल तर भारतातला प्रत्येक व्यक्ती जेलमध्ये जाईल. सनातन धर्माविरोधात हे षड्यंत्र असल्याचं शेवटी शास्त्रींनी नमूद केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.