Poet: बहिणाबाई चौधरी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा असणारी कवयित्री

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.
Bahinabai Chaudhari
Bahinabai Chaudhariesakal
Updated on

जळगांव जिल्ह्यातील असोदे गावात 24 ऑगस्ट 1880 ला बहिणाबाईंचा जन्म झाला.पुढे त्याकाळातील रिवाजानुसार वयाच्या दहाव्या वर्षीच बहिणाबाईचे लग्न झाले. वयाची विशी गाठेपर्यंत दोन अपत्येही झाली. त्यांना शिक्षण मिळालेच नाही. त्यामुळे लिहिण्या-वाचण्याचा प्रश्नच नव्हता. पण बहिणाबाई जन्मत:च अफाट प्रतिभा व शब्द सामर्थ्य घेऊन आल्या होत्या. दळण-सारवण, पाणी भरणे व स्वयंपाक अशी गृहकृत्ये करतानाच बहिणाबाई काही तरी पुटपुटत.

बहिणाबाई निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.

महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या.

Bahinabai Chaudhari
संत कवयित्रीः बहिणाबाई

अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी 1952 मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. खानदेशच्या मातीत दडून राहीलेले हे रत्न महाराष्ट्राला ठाऊक झाले.ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त 35 कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.

बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

Bahinabai Chaudhari
बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी : कवितांमधून दिसणारी स्त्रीमनातील तळमळ, प्रबोधनाचे देशी बोल

‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत.

‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.

पुढे वयाच्या 71 व्या वर्षी 3 डिसेंबर 1951 रोजी बहिणाबाई गेल्या. एक अशिक्षीत पण शहाणी विदुषी निघून गेली. त्यांची ही कविता आजही गीताच्या रुपाने लोकप्रिय आहे.

अरे खोप्यामधी खोपासुगडिणीचा चांगला पहा पिल्लासाठी तिनंझोका झाडाला टांगलापिल्लं निजती खोप्यातजसा झुलता बंगलातिचा पिल्लांमधी जीवजीव झाडाला टांगलाखोपा विणला विणलाजसा गिलक्याचा कोसापाखराची कारागिरीजरा बघ रे माणसातिची उलूशीच चोचतेच दात, तेच ओठतुले दिले रे देवानंदोन हात, दहा बोटं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()