Ganesh Laddu: गणेश लाडूचा तब्बल ३० लाख रुपयांना लिलाव; काय आहे खासियत जाणून घ्या

गणेश विसर्जनानिमित्त देशभरात आज गणरायाच्या निरोपासाठी मिरवणुका सुरु आहेत.
Ganesh Laddu
Ganesh Laddu
Updated on

हैदराबाद : गणेश विसर्जनानिमित्त देशभरात आज गणरायाच्या निरोपासाठी मिरवणुका सुरु आहेत. या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली आहे. त्यातच गणेशाचा लाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैदराबादच्या आयकॉनिक बालापूर गणेश लड्डूला चक्क ३० लाखांची बोली लागली आहे. विशेष म्हणजे या बोलीनं आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्यावर्षी या लाडूला सर्वोच्च २७ लाखांची बोली लागली होती. या लाडूच्या लिलावाची ३० वर्षांची परंपरा आहे.

Ganesh Laddu
Maharashtra Lady CM: लाडकी बहीण योजनेला 'महिला मुख्यमंत्री' पर्याय असेल का? दिल्लीनंतर महाराष्ट्रात काय होणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.