Jaganmohan Reddy : ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा

लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग यंत्राचा (ईव्हीएम) मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे.
Jagan Mohan Reddy
Jagan Mohan Reddysakal
Updated on

हैदराबाद - लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग यंत्राचा (ईव्हीएम) मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. भाजपचे एकेकाळचे समर्थक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनीही यात उडी घेत निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, असे आग्रही मत व्यक्त केले आहे.

‘ईव्हीएम’ हॅक करणे शक्य असल्याची शक्यता अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी व्यक्त केल्याने भारतात त्यावर चर्चा सुरू झाली आहे. मस्क यांचे म्हणणे माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी फेटाळले असले तरी विरोधकांनी त्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. रेड्डी यांनी ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिका वापरण्याचा आग्रह धरला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत रेड्डी यांच्या वायआरएस काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यांनी मंगळवारी ‘एक्स’ या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, जगातील विकसित लोकशाहीमध्ये निवडणुकीत ‘ईव्हीएम’चा नाही तर मतपत्रिकांचा वापर केला जातो. आपल्या लोकशाहीचा खरेपणा कायम राखण्यासाठी आपणही त्याच वाटेने जायला हवे. लोकशाहीचे केवळ अस्तित्व असून उपयोग नाही तर ते दिसायलाही हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.