हरियाणातील गावांत विशिष्ट समुदायास येण्यास मज्जाव; सरपंचांच्या ‘व्हायरल’ पत्राने खळबळ

हरियाणातील नूह येथे हिंसाचार उसळल्यानंतर अनेक शहरात तणाव निर्माण झालेला असताना सरपंचांचे कथित वादग्रस्त पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले
Haryana news
Haryana newsEsakal
Updated on

हरियाणातील नूह येथे हिंसाचार उसळल्यानंतर गुरुग्राम, फरिदाबाद, पलवल आणि गाझियाबादसारख्या शहरात तणाव असताना आज तीन जिल्ह्यातील सरपंचांचे कथित वादग्रस्त पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या जिल्ह्यांतील सुमारे ५०हून अधिक गावांत मुस्लिम समुदायातील व्यापाऱ्यांस येण्यास मनाई करणाऱ्या या कथित पत्राची प्रशासनाने दखल घेतली आहे. ‍(Latest Marathi News)

महेंद्रगड, रेवाडी आणि झज्जर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे त्यांच्या गावात अल्पसंख्याक समुदायातील व्यापाऱ्यांना येण्यास मनाई करणारे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. सरपंचांच्या या कथित पत्रात नूह येथे ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने या पत्राची दखल घेतली असून त्याचा तपास केला जात असल्याचे सांगितले.

Haryana news
Crime News: कपड्यांचे माप देऊन घरी परतणाऱ्या नवरदेवावर गोळीबार, साडेसात हजार रुपयांसाठी केली हत्या

रेवाडी, महेंद्रगड आणि झज्जर जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या स्वाक्षरीचे पत्र जारी केले असून त्यात अल्पसंख्याक समुदायातील व्यापाऱ्यांना गावात येण्यास मनाई केल्याचा उल्लेख आहे. या कथित पत्रात म्हटले आहे, ‘‘की पंचायतीच्या निर्णयानुसार मुस्लिम समुदायातील कोणत्याही व्यापाऱ्याला आणि गैरकृत्ये करणाऱ्याला गावात व्यवसाय करता येणार नाही.’’ या पत्रामध्ये फेरीवाले, भिक्षेकरी आणि गुरांचा व्यवसाय करणाऱ्यांना मनाई असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

Haryana news
Kerala: केरळचे नाव बदलणार! विधानसभेने मंजूर केला ठराव, मुख्यमंत्र्यांनी केंद्राला केली 'ही' विनंती

पत्र लिहिल्याचे सरपंचांनी नाकारले

महेंद्रगड आणि रेवाडी येथील काही सरपंचांशी संपर्क केला असता त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही पत्र जारी केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. महेंद्रगडचे उपायुक्त मोनिका गुप्ता म्हणाल्या, ‘‘सरकारी अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारचे कोणतेही पत्र आलेले नाही. सरपंचांनी जारी केलेले पत्र हे संबंधित जिल्ह्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याचे म्हटले आहे. मात्र आजपर्यंत कोणताही सरपंच उपविभागीय अधिकाऱ्याकडे आलेला नाही. मात्र सोशल मीडियातील पत्राची दखल घेतली असून त्याची चौकशी केली जात आहे.’’(Latest Marathi News)

Haryana news
No Confidence Motion Debate: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर PM मोदी आज देणार उत्तर, जाणून घ्या प्रमुख मुद्दे

महेंद्रगड जिल्ह्यातील गोमला गावचे सरपंच वेद प्रकाश यांनी आम्ही कोणतेही पत्र जिल्हा प्रशासनाकडे दिलेले नाही, असे सांगितले. रेवाडी जिल्ह्यातील चिमनावासचे सरपंच नरेंद्र यादव म्हणाले, की आम्हीही अशा प्रकारचे कोणतेही पत्र लिहिलेले नाही.(Latest Marathi News)

एखाद्या ग्रामपंचायतीच्या लेटरहेडचा समाजकंटकांनी गैरवापर करून ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलेले असावे. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सरपंचाने लिहलेले कथित पत्र कोणत्याही अधिकाऱ्यांकडे आलेले नाही.

- कॅप्टन शक्ति सिंह, उपायुक्त झज्जर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.