नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जीवघेण्या प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा जाहीरपणे चिंता व्यक्त करत पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. फटाक्यांची विक्री अन् ते फोडण्यावर देखील बंदी घालण्यात यावी त्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना आखाव्यात असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले आहेत.
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर देशभर आणि कायमस्वरूपी बंदी का घातली जाऊ शकत नाही का? कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही असे खडे बोल न्यायाधीशांनी यावेळी सुनावले. अशाच पद्धतीने आपण फटाके फोडत राहिल्याने सर्वसामान्यांना राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांवर देखील त्यामुळे गदा येते असे न्यायालयाने म्हटले आहे.