भारतातून येणाऱ्या विमानांना हाँगकाँगमध्ये बंदी ते गुजरात मॉडेलच्या चिंधड्या...वाचा एका क्लीकवर

दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एका क्लीकवर.
दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एका क्लीकवर.
दुपारच्या वामकुक्षीआधी जगाची खबरबात...एका क्लीकवर. Sakal Media
Updated on

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा अवलंब केला आहे. याचदरम्यान इतर देशांनीही भारतातून येणाऱ्या प्रवासी आणि विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे...देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात येणार का? अशा चर्चांणा उधाण येऊ लागलं आहे...देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दरम्यान, गुजरातच्या वलसाड जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये तर मृतदेहांचा खच पडला आहे...

१) कोरोनाचा कहर! भारतातून येणाऱ्या विमानांना हाँगकाँगमध्ये बंदी

नवी दिल्ली - भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा अवलंब केला आहे. दरम्यान, हाँगकाँगने भारतातून येणाऱ्या विमानांना मंगळवारपासून 3 मेपर्यंत स्थगिती दिली आहे...वाचा सविस्तर

२) लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा; केंद्राची भूमिका

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. त्यामुळे विविध राज्यांनी मिनी लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यूसारखी पावले उचलली आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात येणार का? अशा चर्चांणा उधाण येऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लॉकडाउनचा निर्णय राज्यांनी घ्यावा अशी भूमिका मांडली आहे...वाचा सविस्तर

३) गुजरात मॉडेलच्या चिंधड्या; आयसोलेशन वॉर्डमध्ये मृतदेहांचा खच

अहमदाबाद : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज दोन लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून मृतांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, दिल्लीने कर्फ्यू लागू केला आहे. तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याचं दिसत आहे. गुजरातच्या वलसाड जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वॉर्डमध्ये तर मृतदेहांचा खच पडला आहे...वाचा सविस्तर

४) कोरोना बातम्यांवरुन बाळा नांदगावकर यांचं वृत्त वाहिन्यांना आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांकडून कोरोनामुळे राज्यात नेमकी कशी स्थिती आहे, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला किती वेळ लागतोय, या बातम्या दिल्या जात आहेत. या बातम्यांमुळे नागरिकांच्या मनात भीती वाढत असून एक नकारात्मकतेची भावना निर्माण होत असल्याचा सर्वसामान्यांचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी वृत्तवाहिन्यांना आवाहन केलं आहे...वाचा सविस्तर

५) चांगली बातमी - मुंबईची ऑक्सिजन चिंता मिटली, कारण...

मुंबई : ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये म्हणून शनिवारी १६८ रुग्णांना उपनगरीय रुग्णालयातून कोविड रुग्णालय आणि जम्बो केंद्रात हलविल्यानंतर आज मुंबईची ऑक्सिजनची चिंता मिटली आहे. मुंबई महानगरपालिका आता रोज २८५ मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा करणार आहे...वाचा सविस्तर

६) सिंग इज किंग! कोरोना संकटात हरभजन सिंगचा पुणेकरांना मदतीचा हात

पुणे : महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट असून पुणे शहरता 6 हजारांपेक्षा जास्त तर जिल्ह्यात तब्बल 12 हजार 707 नवीन रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्याला भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग मदत करणार असल्याचं सांगितलं आहे...वाचा सविस्तर

७) व्वा रे सरकार! "राज्य तुमच्या बापाची जहागिरी आहे काय"

सातारा : "व्वा रे सरकार! हे राज्य तुमच्या बापाची जहागिरी आहे काय?" असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे सरकारचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम येत्या मंगळवारी गावागावात रयत क्रांती संघटना करणार आहे, असा इशारा संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे...वाचा सविस्तर

८) 'पोकलेन'चे स्फोट होऊन यंत्राचे तुकडे शरीरात घुसल्याने दोघांचा धक्कादायक मृत्यू

अहमदपूर (लातूर) : तालुक्यातील देवकरा येथे विहीर खोदताना पोकलेनला आग लागून स्फोट झाल्याने दोन ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. पितापुत्र पोकलेन यंत्र भाडेतत्त्वावर घेऊन विहीर खोदण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान, देवकरा येथे विहीर खोदण्याचे काम सुरु असताना रविवारी रात्री आठ वाजता अचानक पोकलेनने पेट घेतला आणि त्याचा स्फोट झाला...वाचा सविस्तर

९) धक्कादायक! पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात १० व्हेंटिलेटर्स धूळखात पडून

पुसद (यवतमाळ) : कोरोनाचा प्रकोप वाढला असताना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची मोठ्या प्रमाणावर गरज भासते आहे. केंद्र व राज्य सरकार याच्या पुरवठ्यासाठी युद्धपातळीवरून प्रयत्न करत आहेत. पण पुसद उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे दहा व्हेंटिलेटर्स तब्बल सात महिन्यांपासून धूळखात पडले आहेत...वाचा सविस्तर

१०) राजकारण म्हणजे देशाला लागलेली कोरोनापेक्षाही भयानक कीड - तेजस्वीनी पंडीत

मनोरंजन : देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेचा सामना देश करत आहे. संक्रमित रूग्णांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटलमध्ये रूग्णांना बेड उपलब्ध नाहीत. तसेच रेमडेसिव्हीर औषधांची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्यांचा सामना सामान्य जनतेला करावा लागत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितने याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे. ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे...वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.