Mahadev App : महादेव बुकिंग 'अ‍ॅप'सह इतर 22 Apps वर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Mahadev App
Mahadev Appesakal
Updated on

नवी दिल्लीः महादेव बुकिंग App केंद्र सरकारकडून बंद करण्यात आलेलं आहे. त्यासह आणखी २२ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून बेकायदेशीर सट्टेबाजी होत असल्याचं ED ने नमूद केलं होतं. त्यानुसार केंद्र सरकारला अ‍ॅपवर बंदी घालण्याबाबत निवेदन केलं होतं. सरकारने निर्णय घेत अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

Mahadev App
Bihar Caste Survey: बिहारमधील जातीनिहाय जनगणनेत मुस्लिम, यादव...; अमित शाहांचा गंभीर आरोप

छत्तीसगडमधे दोन दिवसांपूर्वी काही कोटींची रक्कम या अ‍ॅपशी संबंधित ठिकाणांहून जप्त करण्यात आलेली होती. या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचाही संबंध असल्याचं ED ने नमूद केलं आहे.

Mahadev App
Telangana Election : राहुल गांधींनी मागासवर्गीयांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप; निवडणुकीत वातावरण तापलं

दरम्यान, छत्तीसगडमधील निवडणुकीसाठी महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून पैसे पाठविले जात असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी असीम दास याला अटक केली.

दास याच्याकडून ५.३९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे पैसे छत्तीसगडमधील एका राजकीय नेत्याला निवडणुकीसाठी देण्यात येणार होते, असे त्याने चौकशी दरम्यान सांगितल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.