राज्यातील महिलांवरील वाढते अत्याचार आणि त्यांना बॅड टचपासून वाचविण्यासाठी उत्तरप्रदेश राज्य महिला आयोगाने वेगळ्या प्रस्तावाच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पुरुष टेलरने महिलांचे कपडे शिवण्यासाठी त्यांचे मोजमाप घेता कामा नये तसेच इतरांचे केसही कापता कामा नयेत असे सूचित करण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बबिता चौहान यांनी आजच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव सादर केला. यावेळी बैठकीला उपस्थित अन्य सदस्यांनी या ठरावाचे समर्थन केले.