चिकन, फिश, कबाबसह गोबी मंचुरिअनमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी; नियमांचं उल्लंघन केल्यास होणार जन्मठेपेची शिक्षा

माशांसह चिकन, कबाब खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग टाकण्यास बंदी घालणारा आदेश अन्न सुरक्षा विभागाने जारी केला आहे.
Chicken Fish Kabab
Chicken Fish Kababesakal
Updated on
Summary

अन्न सुरक्षा आयुक्तांनी चिकन कबाब आणि माशांच्या खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे.

बंगळूर : गोबी मंचुरिअनमध्ये (Gobi Manchurian) कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातल्यानंतर आता राज्य सरकारने कबाबमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव (Health Minister Dinesh Gundurao) यांनी अधिकाऱ्यांना अन्न सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Chicken Fish Kabab
Diabetes Symptoms : मधुमेहामुळे डोळ्यांवर कोणते विपरित परिणाम होतात? वेळीच सावध व्हा, अन्यथा..

माशांसह चिकन, कबाब खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग टाकण्यास बंदी घालणारा आदेश अन्न सुरक्षा विभागाने जारी केला आहे. गोबी मंचुरिअन आणि कॉटन कँडीमध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर यापूर्वी बंदी घालण्यात आली होती. गुंडूराव यांनी अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्तांना चिकन कबाबमध्ये कृत्रिम रंग मिसळल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सूचनेनुसार राज्यभरात विकल्या जाणाऱ्या कबाबची गुणवत्ता चाचणी करण्यात आली.

चिकन कबाब कृत्रिम रंगामुळे खराब होत असून त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याची बाब लक्षात घेऊन अन्न सुरक्षा आयुक्तांनी चिकन कबाब आणि माशांच्या खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले की, राज्यभरातून ३९ कबाबचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवले असता कबाबचे आठ नमुने कृत्रिम रंगामुळे असुरक्षित असल्याचे आढळले.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (फूड प्रॉडक्ट्स स्टँडर्ड्स अँड फूड ॲडिटीव्ह) रेग्युलेशन्स, २०११ नुसार कोणतेही कृत्रिम रंग वापरले जाणार नाहीत. कबाब तयार करताना कोणत्याही कृत्रिम रंगांना परवानगी नाही. उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये, निर्मात्याला अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा-२००६ च्या नियम ५९ नुसार ७ वर्षे जन्मठेप आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यासाठी न्यायालयात खटले दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.