जय हिंद’, ‘वंदे मातरम्’, ‘थॅँक्यू’ला वगळले; संसद अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यसभेत घोषणाबाजीला आळा

Rajya Sabha: सदस्यांना ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’, ‘थँक्यू’, ‘थॅंक्स’ यांसारख्या घोषणा देता येणार नाहीत.
New Parliament Building
New Parliament BuildingSakal
Updated on

Rajya Sabha: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदारांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आले असून, त्यात सदस्यांना ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’, ‘थँक्यू’, ‘थॅंक्स’ यांसारख्या घोषणा देता येणार नाहीत, असे म्हटले आहे. कोणताही खासदार ६० दिवसांपेक्षा जास्त काळ अनुपस्थित राहिला तर त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी होईल, असेही नियमावलीत म्हटले आहे.

New Parliament Building
Telangana Assembly Elections 2023 : तेलंगणात काँग्रेसचा विजय निश्चित? पक्षाकडून आमदारांना बंगळुरूला हलवण्याची तयारी

संसदेच्या अधिवेशनास येत्या चार डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी राज्यसभा खासदारांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. एकाचवेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही.

सदनात उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांचा बाहेर गवगवा केला जाणार नाही आणि सदनात कोणत्याही प्रकारचे फलक झळकविता येणार नाहीत, असे दिशानिर्देशांमध्ये म्हटले आहे. जोवर सभापती नोटीस स्वीकृत करून त्याची माहिती इतर खासदारांना देत नाहीत, तोवर ती नोटीस सार्वजनिक होता कामा नये, असा दंडक घालण्यात आला आहे.

New Parliament Building
Child Sale Racket : तीन वर्षांत तब्बल 250 हून अधिक बालकांची केली विक्री; तपासात धक्कादायक माहिती उघड

सभापतींकडून जी व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे, त्यावर सदनात अथवा बाहेर टीका केली जाऊ नये, सभापतींकडे पाठ दाखवून बसू नये, जेव्हा सभापती बोलत असतात, तेव्हा कोणाही सदस्याने सदन सोडू नये, सभापती बोलत असताना सदनात शांतता असावी.

सदस्यांनी थेट सभापतींकडे न येता आपले म्हणणे मदतनिसांकडे चिठ्ठीमार्फत द्यावे, सदस्यांनी लेखी भाषण वाचू नये, सदनात वेळेवर उपस्थित राहावे, संसद परिसरात धूम्रपान तसेच व्हिडिओग्राफी करू नये, असे नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.