शेवटी मरणंच? लैंगिक छाळाला कंटाळून इच्छामरण मागणाऱ्या महिला न्यायाधीशाला जीवे मारण्याची धमकी

Euthanasia: डिसेंबर 2023 मध्ये या महिला न्यायाधीशांनी CJI चंद्रचूड यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्यावर लैंगिक छळ झाल्याचे सांगत ईच्छामरणाची मागणी केली होती.
Banda District Woman Judge
Banda District Woman Judge Esakal
Updated on

कथित लैंगिक छळानंतर भारताच्या सरन्यायाधीशांकडे इच्छामरणाची परवानगी मागणाऱ्या महिला न्यायाधीशांनी आता आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या महिला न्यायाधीशांनी आता त्यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्याचा आरोप केला आहे.

या महिला न्यायाधीश बांदा जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात कार्यरत आहेत. त्यांना 28 मार्च रोजी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे.

हे पत्र आर एन उपाध्याय नावाच्या व्यक्तीने पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. लिफाफ्यावर एक मोबाईल क्रमांक देखील लिहिलेला आहे. महिला न्यायाधीशांनी तक्रारीत तीन जणांची नावे दिली असून ते लोक पत्र पाठवण्याच्या कटात सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

उच्च न्यायालयामार्फत लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचेही न्यायाधीशांनी तक्रारीत नमूद केले आहे.

महिला न्यायाधीशांना धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Banda District Woman Judge
VVPAT पावत्यांची शंभर टक्के मोजणी होणार? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

का मागितले होते ईच्छामरण?

डिसेंबर 2023 मध्ये या महिला न्यायाधीशांनी CJI चंद्रचूड यांना पत्राद्वारे त्यांच्यावर लैंगिक छळ झाल्याचे सांगत ईच्छामरणाची मागणी केली होती. त्यांच्यावर होत असलेल्या छळाबाबत न्यायाधीशांनी तक्रार केली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे महिला न्यायाधीशांनी लिहिले होते.

आरोपानुसार, बाराबंकी येथे पोस्टिंग असताना जिल्हा न्यायाधीशांनी महिला न्यायाधीशाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता.

Banda District Woman Judge
CJI Chandrachud Cautions CBI: 'देशविरोधी गुन्ह्यांवरच तपास संस्थांनी लक्ष द्यावं', न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा CBIला सल्ला

तसेच या प्रकरणी 2022 मध्ये त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडेही तक्रार केल्याचे पत्रात लिहिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

महिला न्यायाधीशांनी पुढे लिहिले की, तपास प्रलंबित असताना त्यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या बदली करावा अशी मागणी केली होती. मात्र याकडेही लक्ष दिले गेले नाही. जिल्हा न्यायाधीश पुराव्यांशी छेडछाड करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अशा स्थितीत त्यांनी इच्छामरणाची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.