Bangladesh Violence: बांगलादेशात किती भारतीय अडकलेत? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत दिली माहिती

बांगलादेशमध्ये सध्या राजकीय आरिष्ट्य आलं असून पंतप्रधान शेख हसिना यांनी देश सोडला असून भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. तसंच या देशात सध्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. नव्या काळजीवाहू सरकारची इथं स्थापना होणार आहे.
S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports India
S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports Indiaesakal
Updated on

नवी दिल्ली : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय आरिष्ट्य आलं असून पंतप्रधान शेख हसिना यांनी देश सोडला असून भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. तसंच या देशात सध्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. नव्या काळजीवाहू सरकारची इथं स्थापना होणार आहे. पण इथं मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक अडकून पडले आहेत. नेमका हा आकडा किती आहे? याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत दिली.

S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports India
Bangladesh Stock Market: राजकीय अशांतता असूनही बांगलादेशच्या शेअर बाजारात तुफान तेजी; अनेक शेअर्स 10 टक्क्यांपर्यंत वाढले

बांगलादेशातील परिस्थितीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभा आणि राज्यसभेत याबाबत निवदेन दिलं. त्यांनी सांगितलं की, भारत आणि बांगलादेशात अल्पसंख्यांकांबाबत नजर ठेवली जात आहे. आपल्या राजकीय मिशनद्वारे आम्ही तिथल्या भारतीय समुदायाच्या संपर्कात आहोत. शेजारील देशात या जटिल आणि सातत्यानं अस्थिर परिस्थितीनुसार सीमा सुरक्षा बलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports India
Maharashtra Politics :...तर विद्यमान आमदारांचे तिकीटही कापले जाणार; विधानसभेच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसचा मोठा निर्णय

शेख हसीनाच्या भारतात येण्यावर काय म्हणाले?

संसदेत दिलेल्या निवेदनावर जयशंकर म्हणाले, माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतात दाखल होण्यावर भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारताला खूपच कमी वेळात माहिती देत त्यांचं भारतात दाखल होण्यावर जयशंकर म्हणाले, ५ ऑगस्ट रोजी आंदोलक कर्फ्यु लावल्यानंतरही ढाक्यात एकत्र आले.

सुरक्षा संस्थांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खूपच कमी कालावधीच्या नोटिशीनंतर भारतात आश्रयासाठी येण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली. बांगलादेशच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला हसिना यांच्या उड्डाणाची मंजुरी मिळाली. त्यानंतर त्या काल संध्याकाळी दिल्लीत पोहोचल्या.

S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports India
Pune Reverse Tempo: हडपसरमध्ये उड्डाणपुलावर थरार! पुणे महापालिकेचा टेम्पो ड्रायव्हरविना रिव्हर्सगियरमध्ये सुसाट

किती भारतीय बांगलादेशात अडकले?

जयशंकर यांनी सांगितलं की, बांगलादेशात १९,००० भारतीय नागरिक असल्याचा अंदाज आहे. यांपैकी ९००० हे विद्यार्थी आहेत. यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे जुलै महिन्यात भारतात परतले आहेत. पण बांगलादेशातील भारतीय नागरिकांच्या आम्ही राजकीय मिशनच्या माध्यमातून संपर्कात आहोत. इथं अल्पसंख्यांक नागरिकांची स्थिती कशी आहे, आबाबतही आम्ही माहिती घेत आहोत.

भारतावर काय परिणाम होणार?

जयशंकर यांनी सांगितलं की, बांगलादेशसोबत भारताचे दशकांपासून चांगले संबंध आहेत. तिथल्या परिस्थितीमुळं ही चिंता देखील व्यक्त केली जात आहे. जून महिन्यापासून तिथं परिस्थिती बिघडायला लागली आहे. आत्तापर्यंत ही परिस्थिती कायम आहे. बांगलादेशात जे काही झालं ते केवळ पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा द्यावा यासाठी झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.