बेंगळुरु- बेंगळुरुतील खासगी वाहतूक संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचा विश्वास दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे. आज सकाळपासून, खाजगी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झाली होती. कॅब, टॅक्सी आणि इतर खासगी बसेस चालक संपावर गेले होते. ( Bangalore bandh called off after Karnataka government intervention)
सरकारने राज्यात महिला आणि तृतीयपंथीयांसाठी 'शक्ती योजना' लागू केली आहे. याअतंर्गत महिला आणि तृतीयपंथीयांना बसेसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. याचा परिणाम खासगी वाहतूक करणाऱ्यांवर होणार असल्याने त्यांनी बेंगळुरु बंदची हाक दिली होती.
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरुमध्ये वाहतूक व्यवस्था पूर्ण ठप्प झाल्याने मोठा फटका बसला. सर्वसामान्य नागरिकांना प्रवासास अडचणी आल्या, दुसरीकडे कर्मचारी, विद्यार्थी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सरकारने शक्ती योजनेची व्याप्ती वाढवून ती खासगी वाहतूक दारांसाठीही लागू करावी, अशी वाहतूक संघटनेची मुख्य मागणी होती. पण, सरकारने हे शक्य नसल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.
राज्यातील बाईक टॅक्सीविरोधात ऑटो संघटनेने संप पुकारला होता. यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम पडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सरकारने या मागणीवर विचार करणार असल्याचं म्हटलं आहे. चालकांसाठी वेलफेअर बोर्ड स्थापन करावा, ऑटो चालकांचा विमा उतरवावा आणि व्यावसायिक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायमस्वरुपी टॅक्स लावावा अशा काही ऑटो संघटनेच्या मागण्या आहेत.
वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांची २४ जुलैला भेट घेतली होती. रेड्डी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कळवतो, असं म्हटलं होतं. पण, त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी ११ सप्टेंबर रोजी बेंगळुरु बंदची हाक दिली. सरकारशी चर्चा केल्यानंतर संघटनेने दुपारी संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.