धक्कादायक! सासूचं ऐकून मुलीनं आईचा घोटला गळा; ट्रॉली बॅगेत मृतदेह घालून थेट पोहोचली पोलिस ठाण्यात

ट्रॉली बॅगमध्ये त्या महिलेच्या आईचा मृतदेह होता. आईचा तिने काही तासांपूर्वीच खून केला होता.
Bangalore Crime News
Bangalore Crime Newsesakal
Updated on
Summary

रविवारी भांडणानंतर पॉलने सांगितले की, ती जिवंत असेपर्यंत शांतता नांदणार नाही आणि सोनालीला तिला मारण्यास सांगितले.

बंगळूर : बंगळूरमधील मायक्रो ले-आउट पोलिस ठाण्यात (Bangalore Police Station) दुपारी एक वाजता एक महिला ट्रॉली बॅग घेऊन आत आली. ट्रॉली बॅगमध्ये त्या महिलेच्या आईचा मृतदेह होता. आईचा तिने काही तासांपूर्वीच खून केला होता. मृत महिलेचे नाव बिवा पॉल (वय ७१) असे आहे.

Bangalore Crime News
Karad Crime : यात्रेतलं मांसाहारी जेवण पडलं महागात; 25 जणांना विषबाधा, 'इतक्या' जणांचा मृत्यू

ती कोडिचिकनहळ्ळी येथील एनएसआर ग्रीन्स अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोनाली सेन (वय ३९) हिने फिजिओथेरपिस्टची नुकतीच नोकरी सोडली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली सेन ही तिचा पती आणि सासूसोबत राहते. पतीच्या निधनानंतर बिवा पॉल ही तिच्या मुलीच्या सोनाली सेनच्या घरी राहायला आली.

Bangalore Crime News
Karad Crime : कॉलेजच्या पाठीमागं सापडला सडलेला मानवी सांगाडा; राजमाचीत खळबळ, फॉरेन्सिक टिमकडून पाहणी

मात्र, सोनालीच्या सासूशी तिचे वारंवार भांडण होत असे. रविवारी भांडणानंतर पॉलने सांगितले की, ती जिवंत असेपर्यंत शांतता नांदणार नाही आणि सोनालीला तिला मारण्यास सांगितले. सोमवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास तिचे पती कामावर गेल्यानंतर सोनालीने तिच्या आईला रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे ३० गोळ्या खाऊ घातल्या.

Bangalore Crime News
Eknath Shinde : 'त्या' जाहिरातीवरुन वाद पेटणार? CM शिंदे म्हणाले, फडणवीस आणि आमच्यात कोणतेही मतभेद..

सकाळी ११.३० च्या सुमारास पॉलला पक्षघाताचा झटका आला आणि ती ओरडू लागली. त्यानंतर सोनालीने तिच्या आईचा गळा आवळून खून केला. आणि तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये ठेवला, असे तिने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.